Join us

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात! शेतमालाला किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 7:49 PM

दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता. पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. 

दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील काही बाजार समित्या बंद तर अनेक बाजार समित्यांमध्ये मुहूर्ताची खरेदी झाली. यावेळी खरिपाच्या कापूस, सोयाबीन, कांदा, तूर अशा उत्पादनांची आवक झाली होती तर दिवाळीनिमित्ताने झेंडूचीही आवक झाली होती. आजचे बाजारभाव स्थिर असल्याचं चित्र होतं. दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता. पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. 

दरम्यान, दसऱ्याच्या तुलनेत आज झेंडूला चांगला दर मिळाला. पुणे बाजार समितीत ९५६ क्विंटल झेंडूची आवक झाली होती. तर ४ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. सोयाबीनचा विचार केला तर मागच्या काही दिवासांपासून सोयाबीनच्या दरात जास्त वाढ झाल्याचं चित्र नाही. ४ हजार ४०० ते ५ हजारांपर्यंत सरासरी दर मिळताना दिसत आहे. आज वरोरा  बाजार समितीत ३ हजार रूपये एवढा सर्वांत कमी किमान दर मिळाला तर परभणी बाजार समितीत ५ हजार ५० रूपये एवढा दर मिळाला. 

मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळले आहेत. ७ हजारांवर गेलेले कांद्याचे दर आता २ ते ३ हजारांवर येऊन ठेपले आहेत. तर आज ३०० रूपये ते ४ हजार २०० रूपयांपर्यंत किमान तर २ हजार ५०० ते ५ हजार ५०० रूपयांपर्यंत कमाल दर कांद्याला मिळाला. सरासरी दर हे १ हजार ४०० ते ५ हजारांच्या दरम्यान होते. तर कापसांच्या दरातही जास्त हालचाल दिसून आली नाही. ७ हजार ते ७ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री होताना दिसत आहे. 

मागच्या एका महिन्यापासून कोणत्याच शेतमालाला चांगला दर मिळताना दिसत नाही. कांदा, सोयाबीनचेही दरही केंद्र सरकारने दाबून ठेवले आहेत. कांद्यावरील निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कात वाढ करून मोठ्या धक्का शेतकऱ्यांना दिला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, पण केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. तर अनेक शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीमची रक्कमही मिळाली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळीही अंधारातच गेली आहे. 

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2023
चंद्रपूर---क्विंटल115480050354960
सिल्लोड---क्विंटल40480049004850
परभणीलोकलक्विंटल645490050505000
वरोरापिवळाक्विंटल285300049004400
घणसावंगीपिवळाक्विंटल210480049004800

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2023
उमरेडलोकलक्विंटल44694070507000
वरोरालोकलक्विंटल462700072007100

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2023
बारामतीलालक्विंटल141150043503500
जळगावलालक्विंटल375157541773200
पुणेलोकलक्विंटल4308250046003550
पुणे- खडकीलोकलक्विंटल2350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1420042004200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल69260036003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल27030025001400
मंगळवेढालोकलक्विंटल8370045003600
कल्याणनं. १क्विंटल3400055005000
नाशिकउन्हाळीक्विंटल516330045114000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदिवाळी 2023बाजारमार्केट यार्डसोयाबीनकांदाकापूस