Join us

जाणून घ्या आजचे सोयाबीन-कांदा-कापसाचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 6:43 PM

दिवाळीच्या नंतर मालाच्या दरात वाढ होण्याची शक्यता होती पण मालाचे दर वाढले नाहीत.

दिवाळीतही खरिपाच्या मालाला चांगला दर मिळाला नाही. त्यानंतर दर वाढतील अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. सध्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूरीचे दर स्थिर असल्याचं चित्र बाजारात आहे. दिवाळीच्या नंतर मालाच्या दरात वाढ होण्याची शक्यता होती पण मालाचे दर वाढले नाहीत.

आज रविवार असल्याने बऱ्याच बाजार समित्या बंद होत्या. तर काही प्रमाणात झालेल्या सोयाबीन, कांदा, कापसाचे दर स्थिर आहेत. कांद्याला आज ३ हजार २०० ते ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर कोपरगाव बाजार समितीत सर्वांत कमी २०० तर जुन्नर बाजार समितीत ४ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल रूपये जास्तीत जास्त दर मिळाला. दरम्यान, कापसाचा विचार केला तर कापसाला हमीभावाच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. ७ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ७ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर कापसाला आज मिळाला. 

सोयाबीनला ४ हजार ६०० रूपये हमीभाव केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे. पण  ठरलेल्या हमीभावापेक्षा जास्त दर सध्या सोयाबीनला मिळत असून आज ४ हजार ५०० ते ५ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2023
राहता---क्विंटल1474140045003500
जुन्नरचिंचवडक्विंटल3241200047503200
कोपरगावलालक्विंटल30350037003575
पुणे- खडकीलोकलक्विंटल3300035003250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5300044003700
पुणे-मोशीलोकलक्विंटल474200045003250
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6484200045103200
कोपरगावउन्हाळीक्विंटल117020037753325
भुसावळउन्हाळीक्विंटल2350045004500

 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2023
जळकोटपांढराक्विंटल839490552215075
वरोरापिवळाक्विंटल233460049004700
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल204300050504500
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल207440051004800
समुद्रपूरपिवळाक्विंटल48420054004805
देवणीपिवळाक्विंटल104508252185150

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2023
वरोरालोकलक्विंटल448690073217000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल124700073007150
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड