Join us

कांद्याची घसरण सुरूच! पाहा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 9:09 PM

मागच्या दोन आठवड्यापासून कांद्याचे दर अचानक घसरले आहेत.

शेतकऱ्यांचा नवा कांदा आता बाजारात येऊ लागल्याचे परिणाम बाजारदरावर दिसून येत असून कांद्याचे दर पडले आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी आणि निर्यात शुल्कात केलेली वाढ यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने अडकला आहे. या निर्णयामुळे बराच कांदा देशांतर्गत पडून होता. तर आता नव्या कांद्याची आवक वाढल्याने दर पडले आहेत. 

अनेक शेतकरी दर नसल्याने कांदा शेतातच ठेवत आहेत. तर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण तसे होताना दिसत नाही. आज ९०० रूपये प्रतिक्विंटल ते २ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. 

दरम्यान, आज चिंचवड, लाल, लोकल, उन्हाळी या वाणाच्या कांद्याची आवक झाली होती. जुन्नर-ओतूर बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार २०० रूपये तर पुणे मोशी येथे सर्वांत कमी ९५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर पुणे मार्केट यार्डात सर्वांत जास्त २० हजार ५५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2023
मंचर---क्विंटल538450020001250
दौंड-केडगाव---क्विंटल122580023501800
राहता---क्विंटल207020019001400
जुन्नरचिंचवडक्विंटल30550025001500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2050032002000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल15834100025102000
कोपरगावलालक्विंटल468080016751520
भुसावळलालक्विंटल64100015001200
वैजापूरलालक्विंटल6806100016501500
पुणेलोकलक्विंटल2005570024001550
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4200020002000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल84170022001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल3773001600950
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल2759100030002200
रामटेकउन्हाळीक्विंटल14200024002200
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डकांदा