Lokmat Agro >बाजारहाट > उत्पादन घटूनही कापसाचे दर उतरले! आज किती मिळाला भाव?

उत्पादन घटूनही कापसाचे दर उतरले! आज किती मिळाला भाव?

maharashtra farmer onion production decrease market yard rate decrease | उत्पादन घटूनही कापसाचे दर उतरले! आज किती मिळाला भाव?

उत्पादन घटूनही कापसाचे दर उतरले! आज किती मिळाला भाव?

कापसाचे दर वाढण्याची शक्यता होती पण दर खाली येताना दिसत आहेत.

कापसाचे दर वाढण्याची शक्यता होती पण दर खाली येताना दिसत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरातील कापसाचे दर येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केली होती. पण तसे न होता सध्या कापसाचे दर ७ हजारांपेक्षाही कमी झाले आहेत. लांब धाग्याच्या कापसाला केंद्र सरकारकडून ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर झाला आहे पण तेवढाही दर मिळत नाही. सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या कापसाची आवक होत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे उत्पादन कमालीचे घटणार आहे, त्याचबरोबर भारतातीलही कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे दर वाढणार असल्याची शक्यता होती पण कापसाच्या दराने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे. 

अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असतात. तर खूप कमी शेतकरीकापूस बाजार समितीत विक्री करतात. तर आज राज्यभरातील कापसाच्या दराचा विचार केला तर आज नेर परसोपंत बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे ६ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर अकोला आणि अकोला-बोरगावमंजू या बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार २४४ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. एकूण ६ हजार ७०० ते ७ हजार रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान सरासरी दर आज कापसाला मिळाला आहे.

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/12/2023
सावनेर---क्विंटल1500680068506850
राळेगाव---क्विंटल3500650070856950
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल58680070006900
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1624700071007050
अकोलालोकलक्विंटल62700074887244
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल107700074887244
उमरेडलोकलक्विंटल184650069506800
देउळगाव राजालोकलक्विंटल300710071007100
वरोरालोकलक्विंटल498630070516700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल409630070006700
नेर परसोपंतलोकलक्विंटल137590067006130
काटोललोकलक्विंटल227630070006900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल190700071657100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1000650072006900
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल825665071006850

Web Title: maharashtra farmer onion production decrease market yard rate decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.