Join us

कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच! जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 9:08 PM

जाणून घ्या आज कुठे आणि किती मिळाला कापसाला दर

कापसाला दर नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.  तर राज्यात कुठेच हमीभाव मिळत नसल्याने प्रतिक्विंटल ५०० ते एक हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या सीसीआय आणि राज्य सरकारच्या पणन महासंघाकडून कापूस खरेदीचा घाट घातला जात आहे पण अजून खरेदी सुरू झाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान,  आज लोकल, मध्यम स्टेपल, एच-४ -मध्यम स्टेपल, ए.के.एच. ४ - लांब स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली होती. तर मनवत,  देऊळगाव राजा आणि सिंदी-सेलू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त कापसाची आवक झाली होती. तर कटोल आणि यावल बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर मिळाला आहे. दोन्ही बाजार समितीमध्ये ६ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.  

तर अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये  आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ९९८ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आजच्या दिवसात कोणत्याच बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला नाही. सीसीआय आणि पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/02/2024
भद्रावती---क्विंटल450620067006450
समुद्रपूर---क्विंटल957600068506600
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल549600066006450
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल806655067006600
अकोलालोकलक्विंटल116680070006900
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल120680071966998
उमरेडलोकलक्विंटल749630067006500
मनवतलोकलक्विंटल4600650069706920
देउळगाव राजालोकलक्विंटल4534630069706850
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल187610066506300
काटोललोकलक्विंटल331540067306650
हिंगणालोकलक्विंटल54630068006600
यावलमध्यम स्टेपलक्विंटल22603066506300
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2090655069956750
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल174665071006850
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूस