Join us

कापूस-सोयाबीनला आज बाजार समितीत किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 8:38 PM

ग्राहकांच्या हिताचा विचार करून सरकार शेतमालाचे भाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 

दिवाळी तोंडावर आली असून अनेक शेतकरी आपला शेतमाल बाजारात आणत आहेत. खरिपाच्या पिकाची, अवर्षण, दुष्काळाची स्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळताना दिसत आहे. दिवाळी आता चार दिवसांवर आली आहे पण दरात कोणत्याच प्रकारची वाढ झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर ग्राहकांच्या हिताचा विचार करून सरकार शेतमालाचे भाव दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक शेतकरी बाजारात शेतमाल आणत असतात. त्या पार्श्वभूमीवर अनेकदा दरही चांगला मिळतो. आज बाजारात आलेल्या कापसाचा भाव स्थिर असल्याचं चित्र होतं. ६ हजार ५० रूपये प्रतिक्विंटल ते ७ हजार २२० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कापसाला मिळाला. त्यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला कमी तर लांब धाग्याच्या कापसाला जास्त दर मिळताना दिसत आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचतो पण व्यापारी शेतकऱ्यांना दर कमी देताना दिसत आहेत.  

आज तासगाव बाजार समितीत सोयाबीनला सर्वांत जास्त ५ हजार ६० रूपये  सरासरी दर मिळाला आहे. तर मेहकर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ४०० रूपये कमाल दर मिळाला. तर लासलगाव-विंचूर, लासलगाव, हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा या बाजार समितीत किमान दर सर्वांत कमी म्हणजे ३ हजार इतका मिळाला आहे. 

सोयाबीनचे आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/11/2023
अहमदनगर---क्विंटल1159450049004700
लासलगाव - विंचूर---क्विंटल3215300050004750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67440048764638
माजलगाव---क्विंटल2990430048254750
राहूरी -वांबोरी---क्विंटल20440147514600
कारंजा---क्विंटल12000439549004775
अचलपूर---क्विंटल1055450048004650
तुळजापूर---क्विंटल2150480048004800
मालेगाव (वाशिम)---क्विंटल1850450049504630
राहता---क्विंटल75464049004800
सोलापूरलोकलक्विंटल828370048404705
अमरावतीलोकलक्विंटल15657470048654782
नागपूरलोकलक्विंटल3271430050004825
हिंगोलीलोकलक्विंटल2841460050504825
कोपरगावलोकलक्विंटल803430049674875
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल153390048314000
मेहकरलोकलक्विंटल3420450054005000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल1578300048204791
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल521470048754825
अकोलापिवळाक्विंटल9304400049004600
यवतमाळपिवळाक्विंटल1962430048754587
मालेगावपिवळाक्विंटल36441549194850
आर्वीपिवळाक्विंटल1050400048404350
चिखलीपिवळाक्विंटल4450430050804690
हिंगणघाटपिवळाक्विंटल10051300049904000
पैठणपिवळाक्विंटल35457647504641
उमरेडपिवळाक्विंटल3760350050904750
चाळीसगावपिवळाक्विंटल10467148004700
वर्धापिवळाक्विंटल558401547504400
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल633470048004750
जिंतूरपिवळाक्विंटल811465048254750
मलकापूरपिवळाक्विंटल5920400548254430
दिग्रसपिवळाक्विंटल620465049504865
गेवराईपिवळाक्विंटल221425048164600
परतूरपिवळाक्विंटल189465049004800
तेल्हारापिवळाक्विंटल1250445048504810
देउळगाव राजापिवळाक्विंटल61360048504650
वरोरापिवळाक्विंटल1293300047804300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल726300047004300
साक्रीपिवळाक्विंटल690430047004500
धरणगावपिवळाक्विंटल125428548654700
नांदगावपिवळाक्विंटल77350249414650
तासगावपिवळाक्विंटल20498051405060
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल8470048104700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल1050473049004820
किल्ले धारुरपिवळाक्विंटल42415147004700
औसापिवळाक्विंटल5926450149694890
चाकूरपिवळाक्विंटल370430048354761
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1892485049004875
मुखेडपिवळाक्विंटल156495049754950
हिमायतनगरपिवळाक्विंटल97450046004550
मुरुमपिवळाक्विंटल1921430047904525
उमरगापिवळाक्विंटल390460148504781
सेनगावपिवळाक्विंटल465420048004500
पुर्णापिवळाक्विंटल150477548954871
पाथरीपिवळाक्विंटल96440047754700
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल350470049504800
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल1200455048654705
बुलढाणापिवळाक्विंटल500380048004200
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल463420049004600
सिंदखेड राजापिवळाक्विंटल2056460048504700
बोरी-अरबपिवळाक्विंटल292467548954775
उमरखेडपिवळाक्विंटल570460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल860465047504700
बाभुळगावपिवळाक्विंटल1660425049804580
भंडारापिवळाक्विंटल11400048004200
राजूरापिवळाक्विंटल472424548204571
भद्रावतीपिवळाक्विंटल91400046754338
काटोलपिवळाक्विंटल1110410048004500
आर्णीपिवळाक्विंटल1100430048604500
सोनपेठपिवळाक्विंटल939441248284750
बोरीपिवळाक्विंटल302465047854750

 

कापसाचे आजचे  बाजार समितीतील दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/11/2023
संगमनेर---क्विंटल200500071006050
समुद्रपूर---क्विंटल502700072507150
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल22695071007100
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल635710072007150
उमरेडलोकलक्विंटल155714072107160
वरोरालोकलक्विंटल1026600072116800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल308600073027261
काटोललोकलक्विंटल11710071007100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1800700073707220
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल810700072207120
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल17680070006900
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसोयाबीनकापूसदिवाळी 2023