आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्या बंद होत्या तर काही बाजार समित्यांमध्ये मुहूर्ताची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, कांदा, झेंडू, भाजीपाला पिके, तूर अशा पिकांची आवक झाली होती. दररोजच्या प्रमाणे महत्त्वाच्या कांदा, कापूस आणि सोयाबीनचे दर स्थिर असून झेंडूला चांगला दर मिळताना दिसत आहे.
दसऱ्याच्या सणाला झेंडूने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते. केवळ ५ आणि १० रूपये प्रतिकिलो दराने झेंडू विकावा लागला होता. काही शेतकऱ्यांनी तर मोफत झेंडू वाटला होता. पण दिवाळीत झेंडूची आवक कमी होताना दिसत असून काल दादर मार्केटमध्ये १२० रूपये प्रतिकिलो दर शेतकऱ्यांना मिळाला होता. आज पुणे बाजार समितीत झेंडूला ४ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ८ हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळाला आहे.
दरम्यान, आज वरोरा बाजार समितीत सोयाबीनची आवक झाली होती. या बाजार समितीत किमान ३ हजार ३००, कमाल ४ हजार ८५० रूपये तर सरासरी ४ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. त्याचबरोबर कापसाला किमान ७ हजार रूपये प्रतिक्विंटल, कमाल ७ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल आणि सरासरी ७ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला.
पुण्यातील नारायणगाव (जुन्नर), पुणे, खडकी, पिंपरी, मोशी या बाजार समितीत कांद्याची आवक झाली होती. यावेळी किमान दर १ हजार ते २ हजार ८०० च्या दरम्यान होते आणि कमाल दर ३ हजार ५०० ते ४ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान होते.आज लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर पुणे आणि पिंपरी बाजार समितीत ३ हजार ५०० एवढा सर्वाधिक कमाल दर मिळाला आहे.
आजचे सोयाबीनचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/11/2023 | ||||||
वरोरा | पिवळा | क्विंटल | 144 | 3300 | 4850 | 4400 |
आजचे कापसाचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/11/2023 | ||||||
वरोरा | लोकल | क्विंटल | 285 | 7000 | 7200 | 7100 |
आजचे कांद्याचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/11/2023 | ||||||
जुन्नर - नारायणगाव | चिंचवड | क्विंटल | 35 | 1000 | 4800 | 3000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 9072 | 2500 | 4500 | 3500 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 6 | 2000 | 3500 | 2750 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 8 | 2800 | 4200 | 3500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 128 | 2000 | 3500 | 2750 |