Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Maharashtra Market yard tomato rates today farmer rain monsoon season flood sowing cultivation tomato | Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Market Yard Tomato Rates : राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. परंतु सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कमी दरही मिळत आहे.

Market Yard Tomato Rates : राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. परंतु सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कमी दरही मिळत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पावसाळ्यामध्ये साधारणतः सर्वच भाज्यांचे दर वधारतात. उत्पादन आणि बाजारातील आवक कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळतात. यंदा मान्सूनच्या सुरूवातीच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान झाल्यामुळे बाजारातील आवक अचानक कमी झाली आणि दर वाढले होते. पण आता टोमॅटोचे जर काहीसे कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या २ हजारांपारून ४ हजारापर्यंत दर टोमॅटोला मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज संगमनेर, पुणे आणि मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा जास्त टोमॅटोची आवक झाली होती. तर नागपूर आणि पुणे-मांजरी बाजार समितीमध्ये ५०० आणि ४३४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, सातारा, राहता, कल्याण, पिंपरी, वाई, मंगळवेढा, हिंगणा, इस्लामपूर, जळगाव आणि भुसावळ या बाजार समित्यांमध्ये १०० क्विंटल पेक्षाही कमी टोमॅटोची आवक झाली होती. 

राज्यभर झालेल्या आवकेपैकी सर्वांत जास्त सरासरी दर हा पुणे मांजरी बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे आवक झालेल्या ४३४ क्विंटल टोमॅटोला ५ हजार ४०० रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. तर त्यापाठोपाठ नागपूर बाजार समितीमध्ये ५ हजार २५० रूपये सरासरी दर मिळाला आहे. सोलापूर आणि विटा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ २ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. येथे अनुक्रमे २५६ क्विंटल आणि २५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर टोमॅटो दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2024
कोल्हापूर---क्विंटल315100040002500
पुणे-मांजरी---क्विंटल434450063005400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल58100070003500
संगमनेर---क्विंटल1280150055003500
खेड-चाकण---क्विंटल286300045004000
श्रीरामपूर---क्विंटल30200030002500
विटा---क्विंटल25150030002000
सातारा---क्विंटल65300040003500
राहता---क्विंटल3650057502900
कल्याणहायब्रीडक्विंटल3360046004100
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल14352540003815
अकलुजलोकलक्विंटल19300045004000
पुणेलोकलक्विंटल1575200050003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6300030003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल255350040003750
नागपूरलोकलक्विंटल500350060005250
पेनलोकलक्विंटल165440046004400
वाईलोकलक्विंटल80300060004500
मंगळवेढालोकलक्विंटल36220055004000
हिंगणालोकलक्विंटल14350050004500
पनवेलनं. १क्विंटल675450050004750
मुंबईनं. १क्विंटल1372400045004200
रत्नागिरीनं. १क्विंटल120380044004200
इस्लामपूरनं. १क्विंटल28350040003750
सोलापूरवैशालीक्विंटल25650042002000
जळगाववैशालीक्विंटल58300055004200
नागपूरवैशालीक्विंटल500350055005000
भुसावळवैशालीक्विंटल16250035003000

 

Web Title: Maharashtra Market yard tomato rates today farmer rain monsoon season flood sowing cultivation tomato

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.