सोयाबीनच्या दराचा आलेख मागच्या काही दिवसांपासून उतरता आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी दर वाढून मिळेल या आशेने शेतमाल घरात साठवून ठेवला आहे. पण कापूस, सोयाबीन, मका, तूर आणि कांद्याचे दर तळाला गेल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
दरम्यान, आज रविवार आणि भोगी असल्याने अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. तर पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज सिल्लोड आणि जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली होती. सिल्लोड येथे ५७ आणि जळकोट येथे ७१९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
आज जळकोट येथे ४ हजार ७२१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला तर सिल्लोड येथे ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. आजच्या दिवसातील किमान दर हा ४ हजार ५०० तर कमाल दर हा ४ हजार ९७१ रूपये प्रतिक्विंटल इतका होता. उद्या संक्रांतीला सोयाबीनचे दर किती असतील याकडे लक्ष असणार आहे.
आजचे सोयाबीनचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
14/01/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 57 | 4500 | 4600 | 4600 |
जळकोट | पांढरा | क्विंटल | 719 | 4555 | 4971 | 4721 |