राज्यात सध्या मक्याची चांगली आवक होत असून दररोज साधारण २० ते ३० हजार क्विंटल मक्याची बाजारात आवक होत आहे. यावेळी सर्वसाधारण २००० ते २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
शुक्रवारी राज्यात एकूण २० हजार ९२६ क्विंटल मक्याची आवक झाली होती. यावेळी लाल, हायब्रीड, पिवळी, लोकल जातीचा मकाबाजारात विक्रीसाठी आला होता. सर्वाधिक आवक जळगाव मधून होत असून ४८०० क्विंटल आवक शुक्रवारी झाली होती.
दरम्यान आज सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत २३० क्विंटल लोकल तर ९५ क्विंटल पिवळ्या मक्याची आवक झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण १९३६ ते २२०० रुपयांचा भाव मिळत आहे.
हेही वाचा- मक्याचे गाव म्हणून चिंचोली गावाची ओळख, एकरी 20 ते 22 क्विंटलचा उतारा
आज राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ४७५ क्विंटल मक्याची आवक झाली. पणन विभागाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सर्वसाधारण २००० ते २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
जाणून घ्या कुठे कशी आवक, काय मिळतोय भाव?
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
13/04/2024 | |||||
अमरावती | लाल | 3 | 2000 | 2125 | 2062 |
बुलढाणा | पिवळी | 25 | 2050 | 2050 | 2050 |
छत्रपती संभाजीनगर | लोकल | 230 | 1900 | 2200 | 2050 |
छत्रपती संभाजीनगर | पिवळी | 95 | 1751 | 2120 | 1936 |
जालना | पिवळी | 16 | 2100 | 2250 | 2200 |
नागपूर | ---- | 104 | 1900 | 2100 | 2050 |
पुणे | लाल | 2 | 2400 | 2600 | 2500 |