Join us

Maize Price: मक्याच्या किंमती उतरल्या; जाणून घ्या मक्याचे ताजे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 2:33 PM

Maize Price: बाजारात सध्या मक्याच्या बाजारभावात घट पाहायला मिळत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना त्यामुळे दिलासा मिळत असला, तरी शेतकऱ्यांना चार पैसे कमीच मिळत आहेत. जाणून घेऊयात मका बाजारभाव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आज अमरावती येथे लाल मक्याला (Maize Price) सरासरी २ हजार तर पुणे येथे सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती व जोखीम व्यवस्थापन कक्ष पुणे यांनी  केलेल्या विश्लेषणानुसार मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २४९८ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २४.७० व २२.३५% इतकी घट झाली आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. २०९० प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.

मक्याचे प्रमुख बाजारातील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/07/2024
अमरावतीलालक्विंटल3200021002050
पुणेलालक्विंटल3270028002750
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल8220024002300
15/07/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल31271127962762
पाचोरा----क्विंटल12220024502321
करमाळा----क्विंटल3255025502550
बारामतीहायब्रीडक्विंटल1250027102500
मनमाडहायब्रीडक्विंटल4248126812481
सटाणाहायब्रीडक्विंटल46265026712660
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल5230027252625
बारामतीलालक्विंटल52250030852800
जालनालालक्विंटल49230026502400
अमरावतीलालक्विंटल3200021002050
पुणेलालक्विंटल2280029002850
अमळनेरलालक्विंटल20230025712571
खामगावलालक्विंटल25239423942394
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल154280028802840
मोहोळलालक्विंटल45230023502300
मुंबईलोकलक्विंटल480240040003350
येवलापिवळीक्विंटल3239026282390
धुळेपिवळीक्विंटल4246525012501
मालेगावपिवळीक्विंटल50250026352593
सिल्लोडपिवळीक्विंटल95240025002450
मलकापूरपिवळीक्विंटल8235024602450
यावलपिवळीक्विंटल170160019701800
टॅग्स :मकापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार