Join us

Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:53 PM

भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मकाखरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात घेतली जाते.

प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो. भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात २०२४-२५ मध्ये ६ लाख मेट्रिक टन असल्याचा अंदाज आहे. जी २०२३-२४ च्या तुलनेत २५% कमी होईल असा अंदाज आहे. केंद्र सरकारने दि. २६ जून २०२४ रोजी एकूण ५ लाख टन मका आयातीची अधिसूचना जाहीर केली आहे.

Maize Outlook अहवालानुसार इथेनॉल उद्योगांकडून मक्याची मागणी वाढल्याने बहुतांश बाजारपेठेतील मक्याचे भाव स्थिर किंवा वाढीचे राहिले आहेत. पुढील काळात औद्योगिक क्षेत्रात इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मक्याची कमी उपलब्धता आणि बाजारात इथेनॉलची वाढती मागणी यामुळे मक्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार देशात सन २०२३-२४ मध्ये मक्याचे एकूण उत्पादन ३५६.७३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ६.३३ टक्क्यांनी घट होईल असा अंदाज आहे.

खरीप मक्याचे उत्पादन २२४.१९ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.३ टक्के कमी आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सन २०२३-२४ मध्ये मक्याचे एकूण उत्पादन २३.९८ लाख टन होण्याचा अंदाज आहे.

जे मागील वर्षाच्या तुलनेत ३८.८१ टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे. खरीप मक्याचे उत्पादन १४.३९ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३% कमी आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.

मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे.ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ - रुपये १५२७ प्रति क्विंटलऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ - रुपये १८७७ प्रति क्विंटलऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ - रुपये २००० प्रति क्विंटलस्त्रोत: Agmarknet

अधिक माहितीसाठीबाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, पुणे, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, एम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६फोनः ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०ई-मेल: mirmc.smart@gmail.comवेबसाईट: https://www.smart-mh.org

टॅग्स :मकाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीखरीपपीककेंद्र सरकारराज्य सरकार