Join us

Maka Bajarbhav: भिगवण मार्केटमध्ये मकेला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:19 PM

येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात मका प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये इतक्या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती सभापती विलासराव माने सचिव संतोष देवकर यांनी संयुक्तरीत्या दिली.

भिगवण : येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातमका प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये इतक्या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती सभापती विलासराव माने सचिव संतोष देवकर यांनी संयुक्तरीत्या दिली.

रविवारी (दि. २१) झालेल्या बाजारात धान्य लिलावामध्ये ज्योतिबानगर मलठण (ता. दौड) कालिदास भोसले येथील शेतकरी कालिदास भोसले या शेतकऱ्याची मकाभिगवण बाजारातील सर्वाधिक प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये विक्रमी दराने विक्री झाली.

पोल्ट्री, कापड आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी त्या तुलनेत असलेली कमी उत्पादकता या कारणामुळे मक्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भिगवण उपबाजारात मका व्यवहार २५०० ते ३५०० रुपये राहिला.

बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या शेतीमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर अकलुज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असून, प्रति तास ५ मे. टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते.

शेतमाल तारण योजनाइंदापूर बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही बाजार समिती सुरू केलेली आहे. बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट ६० मे. टन इंदापूर अकलूज रोडलगत ८० मे. टन, उपबाजार भिगवण, निमगाव-केतकी व वालचंदनगर चे ठिकाणी ६० मे. टन व क्षमतेचे भुईकाटा असून, त्यांची २४ तास सेवा उपलब्ध असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सभापती विलासराव माने यांनी केले.

अधिक वाचा: अकलूज बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय कसा बाजारभाव

टॅग्स :मकाबाजारमार्केट यार्डभिगवणपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीमार्केट यार्ड