Join us

पुण्याची मालदांडी अन् धाराशिवच्या पांढऱ्या ज्वारीला आज सकाळच्या सत्रात असा मिळतोय भाव..

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 08, 2024 3:19 PM

जाणून घ्या कुठे कसा मिळतोय भाव..

राज्यात आज सकाळच्या सत्रात ज्वारीची आवक मंदावली असून एकूण 1004 क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज धाराशिव चा पांढऱ्या ज्वारीसह पुण्यातील मालदंडी ज्वारीला चांगला भाव मिळत आहे. क्विंटल मागे साडेतीन हजार ते 4250 रुपयांचा भाव मिळत आहे. पुणे बाजार समितीत आज 689 क्विंटल हायब्रीड ज्वारीच्या आवक झाली असून क्विंटल मागे 4250 रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. धाराशिव मध्ये आज 155 क्विंटल पांढऱ्या ज्वारीचे आवक झाली असून शेतकऱ्यांना क्विंटल मागे साडेतीन हजार ते चार हजार रुपयांचा भाव मिळाला.

दिनांक 4 एप्रिल रोजी जळगावच्या दादर जातीच्या सर्वसाधारण 2810 रुपयांचा भाव मिळत असून ज्वारी बाजारात भाव खात आहे.  काल दिवसभरात राज्यात एकूण 652 क्विंटल ज्वारीचे आवक झाली होती.

दरम्यान आज सकाळच्या सत्रात आवक मंदावली असली तरी सर्वाधिक ज्वारीची आवक पुणे बाजार समितीत झाली. यावेळी हायब्रीड जातीच्या ज्वारीला क्विंटलमागे साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला.

जाणून घ्या सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2024
जलगाव - मसावतदादर65278029202810
अमरावतीलोकल3250028502675
नागपूरलोकल44340036003550
पुणेमालदांडी689350050004250
ताडकळसनं. १48220025002250
तुळजापूरपांढरी155300043003850
छत्रपती संभाजीनगरशाळू115201038652938
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्ड