Join us

Mango Market : इंग्लंडवासीयांना केशर आंब्याची भूरळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 4:51 PM

Mango Market : छत्रपती संभाजीनगरच्या केशर आंब्याला आता परदेशातून मागणी मिळत आहे. कशी ते जाणून घेऊया.

Mango Market : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पिकवित असलेला केशर आंबा अमेरिका, जपान आणि इंग्लंड या देशवासीयांच्या पसंतीला उतरला आहे. केशर आंबा निर्यातीतून जिल्ह्यातील शेतकरी मालामाल होत आहे. यासोबतच जिल्ह्यातील मोसंबी बांगलादेशाला, तर डाळिंब अबुधाबी, दुबईला निर्यात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जपान, इंग्लंड आणि अमेरिका या तीन देशांना केशर आंब्याची निर्यात होते. पूर्वी जहाजामार्गे होणारी निर्यात आता विमानाने होत असल्याने आंबा लवकर बाजारपेठेत पोहोचतो.केशर आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी यावर्षी एकरी साडेसात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविले आहे. केशर आंब्याला युरोपियन बाजारपेठेत चांगली मागणी असते. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंबा शेतीकडे वळावे. 

जिल्ह्यात आंब्याचे ३३३७ हेक्टर क्षेत्र• छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंब्याचे ३ हजार ३३७ हेक्टरवर पारंपरिक गावरान आंब्याचे क्षेत्र आहे. यात केवळ ४०० एकर क्षेत्र हे केशर आंब्याचे असल्याची माहिती आहे.केशर आंब्याची लागवड दरवर्षी वाढत आहे. केशर आंब्यातून मिळणारे उत्पादन अन्य पिकांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी केशर आंब्याच्या शेतीकडे वळत असल्याचे दिसून येते. 

आंब्याची निर्यात सुमारे १२५ टनांवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच शेतकरी आता अतिघन पद्धतीने केशर आंब्याची लागवड करीत आहे. यावर्षी जिल्ह्यातून सुमारे १२५ टन केशर आंब्याची युरोपात निर्यात झाली होती. अतिघन लागवडीतून लवकर उत्पादन मिळते. अन्य कोणत्याही शेतीपेक्षा केशर आंब्याची शेती अधिक लाभदायक आहे. - डॉ. भगवानराव कापसे, कृषी अभ्यासक

जिल्ह्यातून केशर आंब्याची युरोपियन देशांना निर्यात होते. शिवाय डाळिंबाची दुबई आणि अबुधाबीला निर्यात होते. जिल्ह्यातील कृषीमालाची निर्यात वाढावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

पूर्वी आम्ही केशर आंबा निर्यात करीत होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निर्यातीपेक्षा अधिक दर आपल्या बाजारात मिळतो. यामुळे आम्ही निर्यात करण्याऐवजी येथेच पॅकिंग करून आंबा विक्री करतो. केशर आंब्याची शेती किफायतशीर आहे. शेतकऱ्यांनी घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड करावी. - सुशील बलदवा, माजी अध्यक्ष केशर आंबा उत्पादक संघ

तालुका                                         क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर                            ५५८पैठण                                                   ५२०                    फुलंब्री                                                 ५७२वैजापूर                                                ४८५                                          गंगापूर                                                 २४०खुलताबाद                                            ३१३सिल्लोड                                                २३९सोयगाव                                                 ३३                                      कन्नड                                                    ३७२

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंतरराष्ट्रीयबाजारशेतकरीशेती