गुडीपाडव्यानंतर मुंबईबाजारामध्ये आवक लाखात असेल असे सांगण्यात येत आहे. बाजारात दि. १० मेपर्यंत मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला असेल, त्यानंतर मात्र आंबा आवक मंदावेल, असे सांगण्यात येत आहे.
पुनर्मोहरामुळे अनेक ठिकाणी फळगळ झाल्याने दि. १५ मे नंतर आंब्याचे प्रमाण फारच कमी असेल. सध्या झाडावर करवंद, वाटाणा, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा बाजारात येण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे; मात्र तो वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत.
३० टक्के आंबा विक्री- आतापर्यंत ३० टक्केच आंबा बागायतदारांनी विक्रीला पाठविला आहे. उन्हामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारात एकाचवेळी आवक वाढली आहे. जसजसा आंबा तयार होईल तसा बागायतदार विक्रीसाठी पाठवत आहेत.- वाशी बाजारासह अहमदाबाद, सुरत, राजकोट, पुणे, सांगली, कोल्हापूरच्या बाजारात बागायतदार आंबा पाठवत आहे. चांगला दर मिळविण्यासाठी बागायतदारही अन्य बाजारामधील दराचा अंदाज घेत आहेत.
शेवटपर्यंत खायला मिळणार - शेवटच्या टप्प्यात झाडांना मोहोर आला असून, अनेक झाडे मोहरांनी फुलली आहेत. काही झाडांवर कणी, वाटाणा, करवंद, बोरे, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा मे महिन्याच्या शेवटी तयार होणार आहे. पावसावर या आंब्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.- यावर्षी १० मे नंतर शेवटपर्यंत गॅप असेल मात्र त्यानंतर आंबा बाजारात शेवटपर्यंत असेल. यावर्षी आंबा भरपूर असेल परंतु दरावर खर्चाची गणिते अवलंबून आहेत.
सध्या पेटीला अडीच ते एक हजार रुपये दर देण्यात येत आहे. पेटीला किमान तीन हजार रुपये दर अपेक्षित आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात पाठवेपर्यंत येणारा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे दर टिकणे अपेक्षित होते. यावर्षी बागायतदारांची आर्थिक गणिते पुन्हा विस्कटणार आहेत. - राजन कदम, बागायतदार