Join us

झेंडूने दसऱ्याला रडवले; मात्र दिवाळीत शेतकरी सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 11:24 AM

दिवाळीला झेंडू, शेवंती अशा फुलांना चांगला दर मिळाला असून फूल उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

पुणे : दिवाळीसा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर फुलांना मागणी असते. पण अनेकदा मागणी आणि पुरवठा यांचा मेळ साधला नाही तर दर पडतात आणि शेतकऱ्यांची निराशा होत असते. दसऱ्याला अशीच निराशा शेतकऱ्यांच्या वाट्याला आली होती. पण दिवाळीला झेंडू, शेवंती अशा फुलांना चांगला दर मिळाला असून फूल उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

दसऱ्याला मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. त्यामुळे फुलांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. दिवाळीला मात्र काही शेतकऱ्यांनी पुणे फुल बाजाराकडे पाठ फिरवली. परिणामी रविवारी बाजारात दसऱ्याच्या तुलनेत फुलांची आवक कमी झाली. फूल बाजारात फुलांना भाव वाढला असून झेंडू ७० ते ८० रुपयांवर पोहचला तर शेवंती १२० रुपयांपर्यंत भाव पोहोचल्याने फुलांच्या भावात दुप्पट वाढ झाली.

शनिवारी सकाळी बाजारात झेंडूला २० ते ४० रुपये भाव मिळाला. दिवाळीत लक्ष्मीपूजनला दुकान, ऑफिसेस, सोसायटी, गाड्या सजावण्यासाठी झेंडू, शेवंती, पांढरा शेवंती, पिवळी शेवंती या फुलांना मागणी असते. मार्केट यार्डात कालपर्यंत फुलांचा २० ते ५० रुपये भाव होता. मात्र रविवारी फुलांना चांगला भाव मिळाला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डदिवाळी 2023