Lokmat Agro >बाजारहाट > मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

Market Bid of Jaggery, Raisins and Turmeric started on Muhurta | मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

मुहूर्तावर झाले गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गूळ सौद्यामध्ये ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गूळ सौद्यामध्ये ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

अशोक डोंबाळे
सांगली: येथील मार्केट यार्डमध्ये लोकमत न्यूज नेटवर्क दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ, बेदाणा आणि हळदीचे सौदे परंपरेप्रमाणे पार पडले. यावेळी तिन्ही जिन्नसांना उच्चांकी भाव मिळाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पाच दुकानांमध्ये हळद सौदा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी हळदीला १७ हजार एक रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गूळ सौद्यामध्ये ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

बेदाणा सौद्याचा शुभारंभ सभापती सुहास शिंदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. प्रति क्विंटल १६,८०० रुपये दर मिळाला. सांगलीमार्केट यार्डात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून सर्वाधिक कृषीमाल आला पाहिजे, यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकरी बांधवांमध्ये विश्वास निर्माण करावा, मूलभूत सुविधा देण्यात बाजार समिती कुठेही कमी पडणार नाही, असे सभापती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Market Bid of Jaggery, Raisins and Turmeric started on Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.