Join us

Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 5:45 PM

Market : आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कोथिंबीर, भेंडी, अद्रकचे काय भाव ?

Market : आज राज्यातील  विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि कोणत्या बाजारात काय भाव  मिळाला ते पाहुया. 

कोथिंबीर जळगाव बाजारात २४  क्विंटल आवक झाली त्याला साधारण दर ६ हजार ५०० रुपये मिळाला. तर पुणे - पिंपरीमध्ये २ हजार ८०० नग आवक झाली त्याला ८ रुपये प्रती जुडी दर मिळाला. सगळयात कमी दर मंगळवेढा बाजारा पाहायाला मिळाला. ३ हजार २६५ नग आवक झाली त्याला २ रुपये प्रती जुडी दर मिळाला. अद्रक चंद्रपूर- गंजवड बाजारात ११  क्विंटल आवक झाली तर त्याला १० हजार ५०० रुपये दर मिळाला. तर नागपूरातील कामठी बाजरात ४ क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण ५ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भेंडी सातारा वाईमध्ये १० क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण ५ हजार ५०० रुपये दर  मिळाला. तर मंगळवेढा बाजारात १२ क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण २ हजार २०० रुपये दर मिळाला. 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड