Join us

जळगाव ते भुसावळ लिंबूच्या बाजारभावात तेजी; आवक कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:38 PM

राज्याच्या आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली.

रविंद्र शिऊरकर

उन्हाचा पारा वाढल्याने लिंबूची मागणी ही अधिक होत आहे. मात्र बाजारपेठेतील आवक त्या तुलनेत कमीच असल्याने बाजारदरांत तेजी बघावयास मिळत आहे. अनेक शेतकर्‍यांकडे जीवंत पानी साठे उपलब्ध नसल्याने त्यांच्या कडील लिंबू फळबागेस फळे नाहीत हे देखील कमी आवक असण्याचे एक कारण असल्याचे लिंबू खरेदीदार व्यापारी सांगतात.

पणन महामंडळाच्या माहितीनुसार आज मंगलवार (दि. १२) रोजी राज्याच्या जळगाव, छत्रपती संभाजीनगर, राहता, नाशिक, कल्याण, सोलापूर, अमरावती फळे आणि भाजीपाला, पुणे, पुणे-मोशी, मुंबई, भुसावळ अशा एकरा यार्डात एकूण ८४९ क्विंटल लिंबूंची आवक झाली. ज्यात लोकल आणि हायब्रिड वाणांचे लिंबू होते. 

कल्याण येथे आज सर्वात कमी आवक झाली ज्यात ९७५० असा सरासरी दर मिळाला तर सर्वाधिक आवक मुंबई येथे नोंदवल्या गेली ज्यास ४००० असा सरासरी दर मिळाला. आज राज्यात सर्वाधिक दर छत्रपती संभाजीनगर येथे ११००० मिळाला तर सर्वात कमी दर ४०० रुपये पुणे येथे मिळाला. चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड  

आजचे राज्याचे सविस्तर लिंबू बाजारदर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/03/2024
जळगाव---क्विंटल9700090008000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल138000110009500
राहता---क्विंटल49000100009500
नाशिकहायब्रीडक्विंटल608500100009000
कल्याणहायब्रीडक्विंटल39500100009750
सोलापूरलोकलक्विंटल212000102507000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल58000100009000
पुणेलोकलक्विंटल18640034001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल38100001000010000
मुंबईलोकलक्विंटल504300050004000
भुसावळलोकलक्विंटल68000100009000
टॅग्स :फळेफलोत्पादनशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डमहाराष्ट्र