Lokmat Agro >बाजारहाट > Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार

Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार

Market update: Gram is booming; Back to the beans | Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार

Market update : हरभरा आलाय तेजीत; सोयाबीनची माघार

Market update : सोयाबीनला बसला अन् दरात घसरण झाली तर हरभरा तेजीत आलाय, वाचूया काय आहेत आजचे बाजार भाव

Market update : सोयाबीनला बसला अन् दरात घसरण झाली तर हरभरा तेजीत आलाय, वाचूया काय आहेत आजचे बाजार भाव

शेअर :

Join us
Join usNext

Market update :  सणासुदीच्या दिवसांत चणा डाळीची मागणी हरभऱ्याच्या पथ्यावर पडली आहे. हमीभावापेक्षा दीड हजाराने हरभऱ्याला चमक आलेली आहे. याउलट परदेशातून होणारी तेलाची आयात शिवाय सोयापेंडच्या दरात घसरण झाल्याचा फटका सोयाबीनला बसला अन् दरात घसरण झाली आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. त्याचा थेट परिणाम रब्बी हंगामावर झाला. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने हरभऱ्याच्या उत्पन्न कमी झाले आहे.
सोयाबीनला दोन वर्षांपूर्वी दहा हजारांवर भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीनची साठवणूक केली. मात्र, वर्षभरात सोयाबीनचा हमीभावदेखील शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. 
याचदरम्यान भाव स्थिर राहिले. बुधवारी अमरावती येथील बाजार समितीत सोयाबीनच्या २२०८ पोत्यांची आवक झाली. व साधारण ४१०५ रुपये क्विंटल भाव मिळाला. 
यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये जाहीर केला आहे. त्यातच पुढच्या महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हरभऱ्याच्या सरासरी उत्पादनात कमी आलेली असताना भाव हमीदराच्या दरम्यान असल्याने नाफेडची खरेदी झालेली नाही. 
त्यामुळे शासनाजवळ स्टॉक नाही, अशातच सणासुदीत चणा दाळीची मागणी वाढल्याने हरभऱ्याची दरवाढ झालेली आहे. यावर्षी  ५,४४० रुपये हमीभाव असताना सध्या साधारणत: ६८७० रुपयांपर्यंत भाव पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोयाबीन माघारण्याचे हे आहे कारण

परदेशातून तेल आयात होत आहे व त्यावर शुल्क नाही. त्यामुळे तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सोबतच पशुखाद्य असलेल्या 'डीओसी'ला उठाव नाही. 
शिवाय यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची क्षेत्रवाढ झाली व महिनाभरात नवीन सोयाबीन बाजारात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्लँटचालकांकडून खरेदीचा ओघ कमी व साठवणूक करण्यात आलेली नाही.

हरभऱ्याचे बाजारभाव (रु./क्विं.)

हरभरा पिकाचा चढता आलेख 

१५ जुलै                                       ६,००० ते ६,३५०
२२ जुलै                                        ६,००० ते ६,४००
२४ जुलै                                         ६,३०० ते ६,५६०
२६ जुलै                                         ६,३०० ते ६,७००
३१ जुलै                                           ६,२०० ते ६,५६२
२ ऑगस्ट                                        ६,२०० ते ६,५७५
५ ऑगस्ट                                        ६,६५० ते ६,९६९
८ ऑगस्ट                                         ६,७०० ते ७,०४०

मागणी वाढल्याने हरभरा तेजीत 

सणासुदीत चणा डाळीची मागणी वाढल्याने हरभऱ्याच्या दरात वाढ होत आहे. तेलाचे दरात कमी व डीओसीची मागणी कमी झाल्याने सोयाबीनच्या दरात चढ- उतार होत आहे.
- अमर बांबल, अडते

Web Title: Market update: Gram is booming; Back to the beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.