Join us

Market Update : मका व तांदळाच्या ढेपेने केली बाजारात एंट्री; सोयाबीन दर पुन्हा दबावाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:52 PM

आधीच सोयाबीनच्या ढेपेला (Soya cake) बाजारात उठाव नाही. त्यातच मका (Maize) आणि तांदळाची ढेप (Rice Cake) बाजारात आली आहे. या दोन्ही ढेपेच्या तुलनेत सोया ढेपेचे (Soya Dhep) दर अधिक असल्याने वापर कमी झाला. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर (Soybean Market Rate) झाला आहे.

नागपूर : आधीच सोयाबीनच्या ढेपेला बाजारात उठाव नाही. त्यातच मका आणि तांदळाची ढेप बाजारात आली आहे. या दोन्ही ढेपेच्या तुलनेत सोया ढेपेचे दर अधिक असल्याने वापर कमी झाला. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर झाला आहे.

सोया ढेपेचा सर्वाधिक वापर पोल्ट्री फीड म्हणून केला जातो. केंद्र सरकारने राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८ अंतर्गत जानेवारी २०२१ पासून धान्यापासून इथेनॉल तयार करण्याला परवानगी दिली. यात मका व तांदळाचा समावेश करण्यात आला. इथेनॉल निर्मितीत मका आणि तांदळाच्या ढेपेचेही उत्पादन व्हायला सुरुवात झाली. भारतात ७० ते ७५ लाख मेट्रिक टन सोया ढेपेचे उत्पादन होते.

सरासरी ६० लाख मेट्रिक टन सोया ढेपेचा वापर पोल्ट्री फीड व १० लाख मेट्रिक टन ढेपेचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. यातून सरासरी २० लाख मेट्रिक टन सोया ढेपे शिल्लक राहायची. त्यातील काही ढेपेची निर्यात केली जायची. जागतिक बाजारात भारतीय नॉन जीएम ढेपेचे दर अधिक असल्याने निर्यात थांबली आहे.

दुसरीकडे मका व तांदळाची २० लाख मेट्रिक टन ढेप बाजारात आली आहे. या दोन्ही ढेपेचे दर सोया ढेपेच्या तुलनेत कमी असल्याने सोया ढेपेची मागणी असूनही, वापर व खप घटला आहे. त्याचा परिणाम सोयाबीनचे दर दबावात येण्यावर झाला आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून सोया ढेपेच्या निर्यातीला प्रतिक्चिटल एक हजार रुपये सबसिडी देण्याची तसेच जीएम सोया ढेपेच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग, महाराष्ट्र. 

ढेपेचे दर (प्रति किलो)

मका१४ रुपये
तांदूळ१४ रुपये
सोया४२ रुपये

हेही वाचा : कापसाला दर कमी आहे ना? मग कपाशीच्या अवशेषांपासून 'असा' मिळवा अधिकचा नफा

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डशेतकरीभातमकासोयाबीन