Join us

Market Update : मका, हरभऱ्यात तेजी, तुरीची चढ उतार; बाजरी, सोयाबीनमध्ये मंदी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 5:09 PM

तूर, हरभरा, सर्व प्रकारच्या डाळी आणि सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. तर बाजरी, सोयाबीन मंदीत असून खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत.

संजय लव्हाडे

पावसाला जोर नसल्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापारीही हवालदिल झाले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून खरीप हंगामास सुरुवात झालेली असली तरी, अद्याप पावसाने जालना जिल्ह्यात म्हणावा तसा जोर धरलेला नाही.

तूर, हरभरा, सर्व प्रकारच्या डाळी आणि सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. तर बाजरी, सोयाबीन मंदीत असून खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत.

तर सरत्या आठवड्यात २९ जुलै रोजी सोने २७० रुपयांनी वधारले. मंगळवारी त्यात २१० रुपयांची घसरण झाली. ३१ जुलै रोजी सोन्याने पुन्हा ८७० रुपयांची विक्रमी भरारी घेतली. १ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतींत ५४० रुपयांची वाढ झाली. जे सोन्यामध्ये झाले, तेच चांदीमध्ये घडले.

ज्वारीच्या तेजीला ब्रेक

ज्वारीच्या दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे.

• मात्र उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २३०० ते २९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

जालना बाजारपेठेतील शेतमालाची आवक बाजारभाव

गहू१२१ पोते२३०० ते २६००
ज्वारी१५४४ पोते१८०० ते २९००
बाजरी४७४ पोते१५०० ते २६००
मका४४ पोते२४५० ते २६००
तूर२०६ पोते६१०० ते ११०००
हरभरा१२९ पोते५८०० ते ६८५०
उडीद१२ पोते७१०० ते ७६००
सोयाबीन१२७२ पोते४००० ते ४२७०
गूळ२१ क्विंटल३४०० ते ३७००

मक्याच्या दरात वाढ, पोल्ट्री उद्योगात तुटवडा

• देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे. इथेनॉल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढवणार आहे.

• त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे. जालना बाजारपेठेत मक्याचे दर २४५० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

तुरीच्या भावात चढ-उतार

मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरू झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या जालना बाजारपेठेत तुरीचे दर ६१०० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रमार्केट यार्डमार्केट यार्डशेतीजालनाजालनामराठवाडाज्वारीतूरमकासोयाबीनसोनंचांदीपीक