Join us

Market Update : हळद, सोयाबीन घसरले; हरभऱ्याचे भाव वधारले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 7:58 PM

शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद, सोयाबीनचे दर घसरले आहेत. तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ (Market Update)

शेतमालाचे भाव वधारण्याची शेतकऱ्यांना आशा असतानाच हळद, सोयाबीनचे दर घसरले आहेत. तर आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचे चित्र औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. 

हरभरा वगळता बहुतांश शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात गावातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात. 

यात हळद, सोयाबीनचा सर्वाधिक समावेश असतो; परंतु, मागील महिन्यापासून हळदीचे भाव घसरले तर सोयाबीनची दरकोंडी जवळपास आठ ते दहा महिन्यांपासून कायम आहे. परिणामी, शेतकरी यंदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी हरभऱ्याला सहा हजारांचा भाव मिळत होता. आता शेतकऱ्यांजवळील हरभरा संपताच दर ७ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.  तर सोयाबीनची दरकोंडी कायम असून, आता सरासरी ४ हजार रुपयांच्या भावावर समाधान मानावे लागत आहे.

गहू, ज्वारीचा भाव स्थिर

जवळा बाजार येथील बाजारपेठेत सध्या गहू, ज्वारीचा भाव स्थिर आहे. गव्हाला २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. तर ज्वारीची विक्री २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांदरम्यान होत आहे. सध्या गहू, ज्वारीला मागणी नसल्यामुळे आवकही मंदावल्याचे चित्र आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड