Join us

Market Yard: राज्यात आज सकाळच्या सत्रात ७ हजार ३९ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 2:11 PM

आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये ७०३९ क्विंटल तूर दाखल झाली होती.

राज्यात तूरीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून  क्विंटलमागे तूरीला चांगला भाव मिळत आहे. लाल तूरीसह, पांढरी, गज्जर, नं १ तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये ७०३९ क्विंटल आवक झाली.

अमरावतीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण १० हजार ४५ रुपये भाव मिळाला.  धाराशिव बाजारसमितीत आज गज्जर तूरीला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार ३७१ रुपये ते १० हजार ५३५ रुपयांच्या दरम्यान भाव आहेत.

नागपूर बाजारसमितीतही तूरीला आज चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण १० हजार ११६ रुपये भाव सुरु आहे. मागील आठवड्यापासून तूरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे मोठा कल दिसून येत आहे. 

आज दिनांक १६ मार्च रोजी तूरीला सकाळच्या सत्रात मिळालेला दर कसा होता? जाणून घ्या.

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/03/2024
अहमदनगर23880096009250
अमरावती372697001039110045
भंडारा44900090009000
धाराशिव19899001032710113
धुळे11770090608300
हिंगोली83950099009700
जळगाव3860090008600
जालना16800085008300
नागपूर292588001055510116
परभणी10920094009300
टॅग्स :बाजारतुरामार्केट यार्ड