हिंगोली : मार्च एण्डमुळे येथील बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डातील (Market Yard) व्यवहार २२ मार्चपासून, तर मोंढ्यातील भुसार मालाची खरेदी-विक्री २६ मार्चपासून बंद ठेवण्यात आली होती.
आता मार्च एण्ड संपला असून, ३ एप्रिलपासून व्यवहार पूर्ववत (restored from today) होत आहेत. मोंढा आणि हळद मार्केट यार्डात शेतमाल खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
खरेदीदार, आडते यांनी मार्च एंडमुळे नाणेटंचाई निर्माण होत असल्याचे सांगत १८ मार्च रोजी बाजार समितीला पत्र दिले होते. त्यावरून बाजार समिती प्रशासनाने संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार २२ मार्चपासून बंद ठेवले होते. तर मोंढ्यातील भुसार शेतमालाचे व्यवहार २६ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (restored from today)
आता आर्थिक वर्ष संपले असून, ३ एप्रिल रोजी मोंढा आणि संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्री पूर्ववत होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. (restored from today)
क्रमांकानुसारच वाहने उभी करा...
मार्केट यार्डात हळदीची आवक वाढण्याची शक्यता असून, हळद घेऊन मार्केट यार्डात दाखल होणारी वाहने रांगेत आणि क्रमांकानुसारच उभी करण्यात यावी, अशी सूचना बाजार समितीने दिली आहे. उशिरा आलेल्या वाहनांनी रांगेत घुसण्याचा प्रयत्न करू, असे आवाहनही केले आहे.
हळदीचे बीट आजपासून सुरू
* मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या नाणेटंचाईमुळे हळदीचे बीट २२ मार्चपासून बंद आहे. आज(३ मार्च)पासून व्यवहार पूर्ववत होणार असल्यामुळे हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सकाळी १०:३० वाजेपासूनच लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.
* शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणताना वेळेत मार्केट यार्डात पोहोचणे आवश्यक आहे.
हे ही वाचा सविस्तर : Avkali Paus: शेतकऱ्यांना अवकाळीची धास्ती; वातावरणातील बदलाची चिंता वाचा सविस्तर