Lokmat Agro >बाजारहाट > Market yard: बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दराने घेतली उसळी !

Market yard: बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दराने घेतली उसळी !

Market yard: Soybeans tumbled in the market; Bounce taken at the rate of turi! | Market yard: बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दराने घेतली उसळी !

Market yard: बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दराने घेतली उसळी !

सौदा न निघताच उदगीरच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी

सौदा न निघताच उदगीरच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी

शेअर :

Join us
Join usNext

उदगीर येथील बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनचा दर शासनाने घोषित केलेल्या ४,६०० रुपये क्विंटल हमीदरापर्यंत घसरला आहे. पुढील काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तुरीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली असून, बुधवारी उदगीर मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी सौदा न काढताच शेतमालाची खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.

सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. मागील आठवड्यात ४ हजार ६५० रुपये असलेला दर या आठवड्यात ५० रुपयांनी घसरून ४ हजार ६०० पर्यंत खाली आला. खाद्यतेलाचे दर घसरत असल्याने व सोयाबीन पेंढीला मागणी नसल्यामुळे सोयाबीनचे दर भविष्यात आणखी कमी होतील, अशी शक्यता आहे. तर तुरीच्या डाळीला सध्या मागणी असल्याने तुरीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

मागील आठवड्यात तूर ९ हजार ३०० रुपये क्विंटल दराने विक्री होत होती; परंतु या आठवड्यात तुरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या तुरीला ९ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. उदगीरमध्ये सौद्याच्या वेळी समितीचे प्रभारी सचिव व हमालांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे सौदा निघाला नाही. सुरुवातीला बाजार बंद राहतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु दुपारी व्यापाऱ्यांनी पोटलीचा दर काढून शेतमालाची खरेदी केली. जर सौदा निघाला असता तर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असलेल्या तुरीला चांगला दर मिळाला असता अशी भावना शेतकरी व्यक्त करीत होते. पुढील तीन दिवस मार्केट यार्ड श्री गुरू हावगीस्वामी यात्रेनिमित्त बंद राहणार असल्याने व्यापारी मागतील त्या दराने शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

...तर मिळाला असता १० हजारांचा दर

बाजार समिती व हमालांमध्ये झालेला वाद वेळीच मिटवला असता तर सध्या तुरीला दर १० हजारांवर मिळाला असता. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आडत असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार यांनी सांगितले. तर प्र. सचिव प्रदीप पाटील म्हणाले, बाजार समिती व हमालांमध्ये आज गैरसमजातून वाद झालेला आहे. सौदा काढून शेतमालाचे वजन-माप करून गावाकडे जाण्यास उशीर झाला असता म्हणून सौंदा काढला नाही.

तूर विक्रीसाठी योग्य वेळ

सध्या बाजारात तुरीला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरात विक्री करण्यास हरकत नाही. दरवाढीची आशा करून तुरी विक्रीविना ठेवल्यास घरी कीड लागणे, वजनात तूट येणे याप्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या मिळणारे दर हे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहेत. खरीप हंगामात नुकसान झाले आहे. आता तुरीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सोयाबीनचे दर कमीच आहेत. त्यामुळे तूर विक्रीसाठी योग्य वेळ असल्याचे व्यापारी चंद्रकांत बिरादार यांनी सांगितले.

Web Title: Market yard: Soybeans tumbled in the market; Bounce taken at the rate of turi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.