Join us

Market Yard Tur Rate : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या तुरीला किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 9:27 PM

राज्यात तुरीला किती मिळतोय दर?

पुणे : खरीप हंगाम सुरू झाला असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी लागवडी आणि पेरण्या केलेल्या आहेत. पण कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल साठवून ठेवला आहे. त्यामध्ये तूर, कापूस, सोयाबीन आणि हरभऱ्याचा सामावेश आहे. यामध्ये तुरीचे दर हे मागच्या काही महिन्यांपासून स्थिर असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आज मलकापूर, अमरावती, लातूर या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली होती. अमरावती बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १ हजार २०२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. येथे किमान ११ हजार ५०० तर कमाल ११ हजार ९०० रूपये दर मिळाला असून ११ हजार ७०० रूपये हा सरासरी दर होता.

आजच्या दिवसांतील जास्तीत जास्त दराचा विचार केला तर औराज शहाजानी येथे ११ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर बीड बाजार समितीमध्ये ७ हजार ५३१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील राज्यातील सर्वांत कमी सरासरी दर होता. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/06/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल2109021090210902
पैठण---क्विंटल996001081010776
भोकर---क्विंटल798001098010390
राहता---क्विंटल1950195019501
हिंगोलीगज्जरक्विंटल100108001130011050
मुरुमगज्जरक्विंटल2109001090010900
बाभुळगावहायब्रीडक्विंटल13490001149011100
लातूरलालक्विंटल508100001175211400
अकोलालालक्विंटल40695001250011000
अमरावतीलालक्विंटल1202115001190011700
मालेगावलालक्विंटल538501060110571
आर्वीलालक्विंटल43110001210011300
चिखलीलालक्विंटल1294501090010175
नागपूरलालक्विंटल297105001191011558
हिंगणघाटलालक्विंटल35582001199510200
अमळनेरलालक्विंटल10100001020010200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल34113001160011450
मलकापूरलालक्विंटल1120100001200011625
सावनेरलालक्विंटल106112001142011340
लोणारलालक्विंटल55100001179010895
वरोरालालक्विंटल39500100009800
वरोरा-खांबाडालालक्विंटल19800100009900
औराद शहाजानीलालक्विंटल8100511185110951
पातूरलालक्विंटल1892001120010861
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल6105001180011150
नेर परसोपंतलालक्विंटल77500110009166
सिंदी(सेलू)लालक्विंटल13108001111511000
अहमहपूरलोकलक्विंटल2788911140010471
जालनापांढराक्विंटल10190001149910600
बीडपांढराक्विंटल5700180617531
गेवराईपांढराक्विंटल2494001130010500
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल46900103019000
गंगापूरपांढराक्विंटल155326105508189
औराद शहाजानीपांढराक्विंटल14115001200011750
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड