Lokmat Agro >बाजारहाट > माथाडींचा बंद मागे; वाशी मार्केट सुरळीत सुरु

माथाडींचा बंद मागे; वाशी मार्केट सुरळीत सुरु

mathadi strike update; Vashi new mumbai market started smoothly | माथाडींचा बंद मागे; वाशी मार्केट सुरळीत सुरु

माथाडींचा बंद मागे; वाशी मार्केट सुरळीत सुरु

माथाडी कामगारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली; परंतु शेतकऱ्यांपर्यंत वेळेत संदेश न पोहोचल्यामुळे गुरुवारी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात ३५ टक्केच आवक झाली.

माथाडी कामगारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली; परंतु शेतकऱ्यांपर्यंत वेळेत संदेश न पोहोचल्यामुळे गुरुवारी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात ३५ टक्केच आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

माथाडी कामगारांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली; परंतु शेतकऱ्यांपर्यंत वेळेत संदेश न पोहोचल्यामुळे गुरुवारी बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता. दिवसभरात ३५ टक्केच आवक झाली. ग्राहकही मार्केटकडे फारसे फिरकले नसल्यामुळे अघोषित बंदची स्थिती निर्माण झाली होती. माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी १४ डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती.

४ डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन बंदचा इशारा दिला होता. यामुळे मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी कृषिमाल न मागविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु १३ डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला.

पुरेशी आवक झाली नसल्यामुळे कांदा बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती. आवक कमी झाली असली तरी बाजारभावांवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. शुक्रवारी मार्केट सुरळीत सुरू राहील, असेही स्पष्ट केले आहे.

कांदा दरात घसरण
बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये घसरण सुरू आहे. बुधवारी १.५६४ टन कांद्याची आवक झाली होती. होलसेल मार्केमध्ये २३ ते ३६ रुपये दर मिळाला होता. गुरुवारी २०० टनच आवक झाली असून बाजारभाव १९ ते २९ वर आला.

Web Title: mathadi strike update; Vashi new mumbai market started smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.