नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये सद्यःस्थितीमध्ये गहू व तांदळाची सर्वाधिक आवक होत आहे. सोमवारी ६२६ टन गहू व १८७२ टन तांदळाची आवक झाली आहे.
गव्हाचे दर एक महिन्यापासून जवळपास स्थिर असून, तांदळाच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.मुंबईमध्ये सर्वाधिक विक्री तांदळाची होत असते. आहारामध्ये तांदळाचा समावेश असतो. भाकरीही तांदळाच्याच बनविल्या जातात. याशिवाय इडली व इतर तांदळाची गरज असते.
बासमती तांदळाचीही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ मुंबईच आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये २५८ टन बासमतीची आवक झाली असून, १६१४ टन इतर तांदळाची आवक झाली आहे.
कडधान्य तेजीत• बासमती तांदूळ ७० ते १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. साध्या तांदळाचे दर २८ ते ७० वरून ३० ते ७२ एवढे झाले आहेत.• एमपी सीवूरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. डाळी कडधान्याचे तेजी अद्याप कायम आहे. हरभऱ्याचे दर स्थिर आहेत.
ज्वारी-बाजरीलाही मागणी वाढतेयमुंबईकरांकडून ज्वारीलाही नियमित मागणी वाढू लागली आहे. सोमवारी १०७ टन ज्वारीची आवक झाली असून, २६ ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ५५ टन बाजरीची आवक झाली असून, २४ ते ३५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
बाजार समितीमधील प्रतिकिलो बाजारभावबाजरी २४-३५गहू २७-४५एमपीसिवूर ३२-६५ज्वारी २६-६०बासमती ७०-१२०तांदूळ २८-७०साबुदाणा ६१-७०हरभरा ६२-८०हरभराडाळ ७७-९०मसूर ६५-८०मसूरडाळ ७२-१००उडीद ८०-११०उडीदडाळ १०५-१२५मूग ८५-१२५मूगडाळ ९५-१२५तूरडाळ ११०-१७५शेंगदाणा ९५-१२०