Join us

चेन्नईवरून रंगीबेरंगी गुलाबांची मोठ्या प्रमाणात आवक; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 1:58 PM

यंदा गुलाबांच्या फुलांसाठी Rose Flower Market अनुकूल वातावरण मिळाल्याने गुलाबाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शहरातील बाजारपेठेत गुलाबांचे आगमन झाले आहे. चेन्नई येथून मोठ्या प्रमाणात गुलाब बाजारात दाखल होऊ लागला आहे.

यंदा गुलाबांच्या फुलांसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने गुलाबाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शहरातील बाजारपेठेत गुलाबांचे आगमन झाले आहे. चेन्नई येथून मोठ्या प्रमाणात गुलाब बाजारात दाखल होऊ लागला आहे.

या वर्षी जूनअखेरपासून विविध सणांना सुरुवात होत आहे, तर लग्नांचे मुहूर्तही असल्याने फुलांना मागणी वाढणार आहे. फुलबाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे फुलाचे उत्पादन घटले होते, परंतु पावसाळा वेळेत आल्याने फुलांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे.

गुलाबाच्या हाराने खाल्ला भावफुलांना मागणी अधिक असल्याने गुलाबाच्या फुलांनी भाव खाल्ला आहे. यंदा फुलांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. गुलाबाचा एक हार आठशे ते हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने यंदा फुलांचा सुगंधही महागला आहे.

गुलाब, लिली, मोगरा, निशिगंधा, अॅस्टर यांसारखी फुले बाजारात भाव खात आहेत. शहरात साधारण नांदेड, भुसावळ, सुरत, अहमदनगर, पुणे, शिर्डी येथून शहरात फुले येतात. यंदा चेन्नई येथूनही गुलाब बाजारात दाखल झाला आहे.

चेन्नई गुलाबाला ग्राहकांची पसंतीसध्या बाजारात चेन्नई गुलाब शंभर ते दोनशे रुपये शेकडा मिळत आहे, तर साधा गुलाब शंभर ते तीनशे रुपये शेकड्याने मिळत आहे. ग्राहकांचीही गुलाब खरेदीला पसंती मिळत आहे.

पाऊस वेळेत दाखल झाल्याने वातावरण फुलांना अनुकूल आहे. गावरान गुलाब येत्या काही दिवसांत बाजारात येईल. सध्या चेन्नई गुलाब भरपूर उपलब्ध आहे. ज्या फुलांची विशेष मागणी आहे, ती महागली आहेत. लग्नसमारंभामुळे यंदा मागणी वाढली होती. अजून पाऊस सुरू झाल्यावर भाव कमी होतील. - विनोद महाडिक, फुल विक्रेते

टॅग्स :फुलंबाजारफुलशेतीचेन्नईपीक