अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदाबाजारात विक्रीसाठी आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर यासाठीची दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपयांना कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक कांदा खरेदी करीत आहे.
यंदा गतवर्षी पेक्षा उत्पादन अधिक झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र अद्याप व्यापाऱ्यांची मागणी नाही. त्यामुळे उत्पादन वाढूनही कांद्याचे उत्पन्न कमी होते की काय याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावात पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
किरकोळ विक्रीवर भर
• व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी किरकोळ विक्रीवर भर दिला आहे.
• रस्त्यावर दुकाने थाटली असून कांदा माळा विकत आहेत. छोट्या कांद्याची माळ दीडशे तर मोठी माळ अडीचशे रुपयांना विक्री होत आहे.
गेल्या वर्षीपेक्षा भाव घसरले
• अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतकऱ्यांकडे येत असतो.
• गतवर्षी मणाला १४०० रुपये दर मिळाला होता. यावेळी आठशे ते अकराशे पर्यंत दर दिला जात आहे.