Join us

Mirchi Market : लाल मिरचीची आवक घटली, हिरवी मिरचीला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 6:47 PM

Mirchi Market : नंदुरबार बाजारात लाल मिरचीच्या हंगामाला हिरव्या मिरचीच्या वाढलेल्या दरांनी ब्रेक लावला आहे.

नंदुरबार : नंदुरबार बाजारात लाल मिरचीच्या हंगामाला (Chilly Market) हिरव्या मिरचीच्या वाढलेल्या दरांनी ब्रेक लावला आहे. बाजारात हिरवी मिरची थेट ५० रुपये प्रतिकिलो दरात व्यापारी खरेदी करत असल्याने मिरची लाल होण्यापूर्वीच बाजारात येत आहे. यामुळे बाजारात लाल मिरचीची आवक कमी झाली आहे. हिरव्या मिरचीला दर मिळत असल्याने दिवाळीनंतर लाल मिरचीचे बाजारात वाढीव आगमन होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 

नंदुरबार बाजार (Nandurbar Mirchi Market) समिती मंगळवारी ३०० क्विंटल मिरची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पुन्हा ऊन पडू लागल्याने लाल मिरचीची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु सोमवारपासून बाजारात हिरवी मिरची थेट ५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे. यामुळे शेतकरी हिरव्या मिरचीचा Green Chilly Market) तोडा करून बाजारात आणत आहेत. शेतकरी बांधव, येईल तेवढी मिरची हाती घेत बाजारात आणून त्याची विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचे नंदुरबार बाजार समितीकडून सांगण्यात आले. या सर्व प्रक्रियेचा भार आगामी मिरचीपूरक उद्योगांच्या उत्पादनांवर होणार आहे.

लाल मिरचीचे दर वाढले मंगळवारी बाजारात लाल मिरची प्रतिक्विंटल १९११ ते ३९२० या दरात उपलब्ध होती. प्रामुख्याने यंदा शेतकऱ्यांनी गौरी आणि शार्कवन असे दोन वाण लागवड केले होते. या वाणांचा हंगाम गेल्या १५ दिवसांपासून तेजीत सुरू झाला आहे. झाडावर मिरची लगडण्यास प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी त्या, लाल होण्याची प्रतीक्षा करत होते. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर मिरची लाल होण्याची प्रक्रिया वेगात सुरू होती. यादरम्यान बाजारात हिरवी मिरची थेट ५ हजार रुपये क्विंटल दरापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी लालऐवजी हिरवी मिरची तोडणी करून बाजारात आणणे सुरू केले आहे. 

याबाबत नंदुरचार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले की, मिरची हंगाम सुरू झाला असला तरी हिरवी मिरची दरांमुळे अधिक तेजीत आहे. हे दर आगामी काळातही कायम राहतील, यामुळे शेतकरी मिरची तोडून बाजारात आणून त्याची विक्री करत आहेत. यातून शेतकऱ्यांचा लागवडखर्च आधीच वसूल होणार आहे. नंतरच्या हंगामात लाल मिरची शेतकऱ्यांना नफा देणार आहे. 

बुधवारी बाजार बंद असतानाही मिरची तोडा केलेल्या शेतकऱ्यांनी माल आणून ठेवल्याचे दिसून आले. हिरव्या मिरचीला स्थानिक बाजारातच अधिक भाव असल्याने शेतकरी दरदिवशी किमान ५ क्विंटल माल तोडून आणत आहेत. गेल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांनी १० क्विंटलपेक्षा अधिक हिरवी मिरची विक्री केल्याचे सांगण्यात आले. १० दिवसांपासून हिरवी मिरची तेजीत आहे.

 

टॅग्स :मिरचीशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड