Join us

Moog Price: मुगाच्या बाजारभावाला झळाळी, पेरा घटल्याने भविष्यात वाढणार बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:37 PM

Moog Price: मूगाचे बाजार भाव सध्या चांगले असून वाशिम बाजारसमितीत शनिवारी मुगाला ७ हजारावर भाव मिळाला. पेरा कमी राहण्याची शक्यता असल्याने मुगाचे दर वाढते राहण्याची शक्यता आहे.

वाशिम जिल्ह्यासह राज्यात कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे. आता पावसाळ्यात कडधान्यांच्या मागणीत वाढ होत असताना मूग (moog price) आणि उडिदाचा साठा मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे बाजार समित्यांत या शेतमालाचे दर गगनाला भिडले आहेत. तथापि, शेतकऱ्यांकडे हा शेतमाल फारसा शिल्लक नसल्याने दर वाढूनही बाजार समित्यांत या शेतमालाची आवक मात्र नगण्य आहे. शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला कमाल ७ हजार ८०० रुपये, तर उडिदाला कमाल ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता.

यंदाही पेरा राहणार कमीच जिल्ह्यातील शेतकरी मूग आणि उडीद या पिकांच्या पेरणीबाबत उदासीन आहेत. या पिकांचा खर्च अधिक असताना वन्य प्राण्यांचा या पिकांमध्ये मोठा उपद्रव असतो. तसेच कमी कालावधीच्या पिकांना अवर्षण, अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाही खरीप हंगामात या पिकांचा पेरा कमीच राहण्याची शक्यता आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता देशभरात गेल्या काही वर्षांत मूग आणि उडीद या कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनही घटले आहे. त्यात गतवर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने या पिकांचे क्षेत्र नावापुरतचे होते. परिणामी यंदा शेतमालाला मोठी मागणी असल्याने पुढील काळात मूग आणि उडीद या दोन्ही शेतमालाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शनिवारी मूगाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

22/06/2024
अमळनेरचमकी5720074007400
लोणारचमकी5600072806640
पातूरचमकी2715071507150
लातूरहिरवा11550074007300
येवलाहिरवा1550055005500
अकोलाहिरवा131686076457360
पुणेहिरवा449200101009650
मुर्तीजापूरहिरवा15685074007175
औराद शहाजानीहिरवा3650165016501
भंडाराहिरवा4660066006600
नागपूरलोकल25680070006950
अहमहपूरलोकल5680068006800
नादगाव खांडेश्वरलोकल1580066506225
अमरावतीमोगली6700075007250
टॅग्स :मूगबाजारशेती क्षेत्र