Moong Market Update :
हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मुगाने बुधवारी १३ हजार रुपयांचा पल्ला गाठला. मागील काही वर्षांत मुगाच्या पेऱ्यात घट झाल्याने उत्पादन अत्यल्प होत आहे. परिणामी, बाजारात आवक कमी होत असल्याने भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तर सोयाबीनची दरकोंडी मात्र कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. यंदा पावसाने वेळेत सुरुवात केल्यामुळे खरिपाच्या पेरण्या मृगात आटोपल्या. मृगात पेरणी केलेला मूग आणि उडदाचे उत्पादन चांगले होते, असे शेतकरी सांगतात.
त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा मूग व उडदाचा पेरा वाढला होता. परंतु, पीक भरात असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. तसेच कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने आठवडा ते पंधरवडा उघडीप दिली. परिणामी, खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसला.
याचा परिणाम मूग, उडदाच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे यंदा मूग, उडदाच्या पेऱ्यात वाढ होऊनही उत्पादनात घट झाल्यामुळे मोंढ्यात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला.
सध्या हिंगोलीच्या मोंढ्यात मुगाची सरासरी २० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. किमान भाव १३ हजार ५० ते कमाल १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. भाव समाधानकारक मिळत असला तरी मुगाचे उत्पादन कमी झाल्याने फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे
किमान भाव १३ हजार ५० ते कमाल १० हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
भाव समाधानकारक मिळत असला तरी मुगाचे उत्पादन कमी झाल्याने फायदा आहे.तर सोयाबीनची दरकोंडी कायम असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नवीन सोयाबीनला समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली आहे.
सोयाबीनची आवक वाढली...
■ जिल्ह्यातील काही भागांतील शेतकऱ्यांकडे नवीन सोयाबीन आल्याने मोंढ्यात आवक वाढली आहे. सरासरी ५०० ते ६०० क्विंटलवरील आवक आता ८०० ते ९०० क्विंटलपर्यंत होत आहे. दरकोंडी मात्र कायम असून, यंदाही शेतकऱ्यांची पदरी निराशा येत आहे.
■ लागवड खर्चाचा विचार केल्यास किमान सहा हजार रुपयांचा भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. परंतु, सोयाबीन पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने लागवडही वसूल होतो की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकत आहे.
मोंढ्यातील शेतीमालाला मिळणारा सरासरी भाव
शेतमाल | दर (प्रति क्विंटल) |
उडीद | ६,३०० |
तूर | ९,७७० |
भुईमूग | ५,६४० |
मूग | ११,५२५ |
सोयाबीन | ४.३५७ |
हळद | १३,२०० |