Join us

Mosambi Market :  मोसंबी घेऊन शेतकरी होतोय मालामाल; तीन राज्यांत केली जाते निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:48 AM

Mosambi Market : जालना जिल्ह्यातील शेतकरी कसे होत आहेत मालामाल ते पाहुया.

Mosambi Market :  

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गेल्यावर्षी तब्बल दीड लाख टन मोसंबीची तीन राज्यांत निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ झाला आहे.

जालना जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी उत्पादनाकडे वळाले आहेत. त्यात अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर तालुका व परिसरात मोसंबीची अधिक प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. 

विविध संकटांवर मात करीत शेतकरी मोसंबीचे उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना माल विकतात, तर काही शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मालाची विक्री करतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या मालाची इतर राज्यात निर्यात केली जाते. 

जालना जिल्ह्यातील शेतकरी मोसंबीचे उत्पादन घेऊन परराज्यांत निर्यात केली जात असल्याने शेतकऱ्यांना यातून चांगले पैसे देखील मिळतात.  त्यामुळे येत्या काळात आता येथील शेतकरी मोसंबी पिकाकडे वळतांना दिसत आहेत. गेल्यावर्षी दिल्ली, जयपूर, उत्तर प्रदेश आदी भागात तब्बल एक लाख ६० हजार क्विंटल मोसंबी निर्यात केली आहे.

मोसंबीची निर्यात दीड लाख क्विंटलवरजिल्ह्यात मोसंबीचे उत्पादन अधिक आहे. शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांनाही माल विक्री करतात. सोबतच परराज्यात मालाची निर्यात होत असून, बाजार समितीच्या माध्यमातून गेल्यावर्षी दीड लाख क्विंटल निर्यात झाली आहे.

मोसंबी लागवडीचे क्षेत्र किती? (हेक्टरमध्ये) तालुका                         क्षेत्रअंबड                           ९५३४बदनापूर                       ८६००घनसावंगी                     ७६०२जालना                          ३०१९परतूर                            ४३५मंठा                               १६१भोकरदन                       ११०जाफराबाद                     ८४

'या' भागांमध्ये केली जाते निर्यातजालना जिल्ह्यात उत्पादित होणारी मोसंबी जयपूर, उत्तर प्रदेशासह दिल्लीत निर्यात केली जाते. उत्पादित मालाचा दर्जा चांगला असेल तर त्याला इतर राज्यात अधिक प्रमाणात भाव मिळत आहे. 

मोसंबी उत्पादक म्हणतात...

शेतकरी विविध संकटांचा सामना करून मोसंबीचे उत्पादन घेतात. त्या मालाला परराज्यात मागणी आहे.- दिनेशराव वाघ, शेतकरी

अनेक मोसंबी उत्पादक शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना माल विकतात, तर काही शेतकरी परराज्यात मालाची निर्यात करतात.- विठ्ठल सोनवणे, शेतकरी

परराज्यातून मागणी

कृषी उत्पन्न बाजार समितीतून गेल्यावर्षी एक लाख ६० हजार क्विंटल मोसंबीची इतर राज्यात निर्यात करण्यात आली आहे. यंदाही परराज्यात निर्यात होणार आहे.- मोहन राठोड, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड