Join us

Nafed onion price: नाफेडचा भाव फुटल्यावर बाजारात कांदा वधारला, नाफेड आता दररोज भाव जाहीर करणार

By पंकज प्रकाश जोशी | Published: June 20, 2024 4:23 PM

Nafed Onion Price: नाफेडचे बाजारभाव जाहीर झाल्यानंतर लासलगाव बाजारात कांदा बाजार भाव वधारले आहेत. दरम्यान आता आठवड्याला नव्हे, तर दररोज नाफेडचे कांदा बाजारभाव जाहीर होणार आहेत.

Nafed onion price will declare on daily basis या आठवड्यात नाफेडने कांदा खरेदीचे आठवड्याचे बाजारभाव जाहीर करताच लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये कांद्याचे भाव वधारले असून त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत कांद्याला सरासरी २४०० रुपये ते २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होते. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीतही २५०० रुपयांच्या आसपास कांद्याचे बाजारभाव होते. त्याचवेळेस नाफेडचे खरेदी दर मात्र २१०० रुपयांच्या आसपास होते.

नाफेडचे दर हे दर आठवड्याला डोकामार्फत अर्थात केंद्रातील ग्राहक संरक्षण विभाग ठरविणाार होता. त्यानुसार या आठवड्याचे कांदा खरेदी दर रुपये २५५५ प्रति क्विंटल बकरी ईदच्या सुटीनंतर म्हणजेच मंगळवार दिनांक १८ जून रोजी जाहीर झालेत. हे दर जाहीर झाल्याबरोबर स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांनीही कांद्याचे खरेदी दर वाढवले.

सध्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या महत्त्वाच्या बाजारसमित्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सरासरी ३ हजार ते ३१०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव आहेत. या संदर्भात नाफेडचे संचालक केदा नाना आहेर यांनी ‘लोकमत ॲग्रो’ला माहिती दिली की नाफेडच्या दरांचा स्थानिक कांदा बाजारभावांवर नेहमीच सकारात्मक परिणाम होत असतो. आतही नाफेडने दर जाहीर करताच स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी दर वाढला आहे. खरेदीदारांची संख्या जास्त असल्यानेही कांदा दर वाढल्याचे श्री. आहेर यांनी स्पष्ट केले.

नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीने सांगितले की नाफेडने कांदा खरेदी दर वाढवले, तर स्थानिक बाजारातील कांदा खरेदीवर त्याचा परिणाम होत असतो. नाफेडच्या वाढलेल्या दरानंतर लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीत कांदा बाजारभाव वाढल्याचे यापूर्वीही घडलेले आहे. ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे.

नाफेडचा भाव दररोज जाहीर होणारमागील आठवड्यापासून डोकामार्फत नाफेडचे बाजारभाव जाहीर होत आहेत. सुरूवातीला हे बाजारभाव दर आठवड्याला जाहीर होणार असे सांगण्यात येत होते. त्यानुसार या आठवड्यात कांदा बाजारभाव जाहीरही झाले. मात्र आजपासून या नियमात केला जात असून आता नाफेड कांदा खरेदीचे भाव दररोज जाहीर होणार आहेत. नाफेडचे संचालन केदानाना आहेर यांनी ‘लोकमत ॲग्रो’ला ही माहिती दिली. येणाऱ्या काळात बाजारसमित्यांच्या आवारातच नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

नाफेडचे बाजारभाव जाहीर झाल्यानंतर जर बाजारात कांद्याचे भाव वाढत असतील, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की बाजारात कांद्याची उपलब्धता कमी आहे. बाजारात आवक वाढते आणि जेव्हा कांद्याचे बाजारभाव पडतात, खरं तर त्यावेळेस नाफेडने चांगला दर देऊन शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून साठवला पाहिजे, पण सध्या तसे होताना दिसत नाहीये.- विजय जावंधिया, शेतकरी नेते व कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक

आजचे कांदा बाजारभाव असे आहेत...

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

20/06/2024
कोल्हापूर---5037100032002200
अकोला---405220030002500
छत्रपती संभाजीनगर---7314115026001875
खेड-चाकण---200200030002500
सातारा---235250030002750
नागपूरलाल3000250033003100
भुसावळलाल9220030002500
पुणेलोकल11154100032002100
पुणे -पिंपरीलोकल12190028002350
पुणे-मोशीलोकल801150030002250
मलकापूरलोकल280150030002225
मंगळवेढालोकल33250031002500
कामठीलोकल54300040003500
कल्याणनं. १3240032002800
नागपूरपांढरा2040270033003150
हिंगणापांढरा1279027902790
येवलाउन्हाळी8000100031612800
लासलगावउन्हाळी11271110032513051
लासलगाव - विंचूरउन्हाळी12200120033003050
मालेगाव-मुंगसेउन्हाळी8000180032112900
सिन्नर - नायगावउन्हाळी375100031442950
चांदवडउन्हाळी7200180038612930
पिंपळगाव बसवंतउन्हाळी15400135035003150
देवळाउन्हाळी6200150032253000
नामपूरउन्हाळी474070035003000
नामपूर- करंजाडउन्हाळी4200200038003300
टॅग्स :कांदाबाजारशेतकरी