Join us

Naturally grown wild vegetables are nutritious : नैसर्गिकरित्या पिकवलेल्या रानभाज्या गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 2:59 PM

Naturally grown wild vegetables are nutritious : अंबाडी, करटुले, वाघाटे, तरोटा, फांद, झटुलीच्या फुलांना मिळतेय मागणी

Naturally grown wild vegetables are nutritious : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात. आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असल्यामुळे खाद्यप्रेमींमध्ये या रानभाज्याकडे कल वाढतांना दिसत आहे. 

दरवर्षी पावसाळा आला की, ग्रामीण भागात रानमाळावर रानभाज्या उगवतात. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना या भाज्यांची चांगली जाण असल्याने ते रानात भटकून या भाज्या मिळवितात व त्यांचा आस्वाद घेतात. या भाज्या संपूर्णत: नैसर्गिक असतात.  शहरी भागात मात्र याबाबत फारशी जनजागृती नाही. मात्र,  सोशल मीडियामुळे या रानभाज्यांना आता शहरी भागातही मोठी मागणी वाढली आहे. ज्या नागरिकांना याबाबत माहिती आहे, ते पावसाळ्याची यासाठी आवर्जून वाट पाहत असतात.

केना, चमकुराची पाने, फांदची भाजी, तरोटा, वाघाटे, गोबरू कंद, तांदुळजा, सुरणकंद, कुई, गुळवेल, शेवगा, कुंजीर, बांबू कंद, म्हैसवेल अशा निरनिराळ्या भाज्या विक्रीला आल्या आहेत. तरोटा ही वनस्पती कोवळी असताना तिची भाजी खूप रुचकर लागते, तर झटुलीची फुले अंडा चवीला भुर्जीलाही मागे टाकते. 

सावळदबारा परिसरात या भाज्यांना २५ ते ५० रुपये पाव किलो असा भाव मिळत आहे. गाव परिसरातील अदिवासी बांधव त्यांना विक्रीला आणत आहेत.

या आहेत रानभाज्यासध्या बाजारामध्ये हडसन, काटेमाठ, तरोटा, फांद, झटुलीची फुले, आदी रानभाज्या विक्रीला आलेल्या आहेत. त्यांना चांगला दरही मिळतोय. त्याशिवाय सध्या बाजारात करटोली, चिवळ, आघाडा, हडस, शेपू, पाथरी, अंबाडी हया पण भाज्या मिळतात. 

रासायनिक खते, औषधींपासून दूर• या रानभाज्या पावसाळा सुरू झाल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने जंगल परिसरातील झाडाझुडुपांमध्ये उगतात. त्यांच्यासाठी कोणत्याही रासायनिक खते किंवा कीटनाशकांचा वापर नसतो.• शरीराला अत्यंत पोषक असलेल्या या रानभाज्या विविध आजारांसाठी उपयुक्त म्हणून ओळखल्या जातात.• तसेच त्यांची चव ही इतर भाज्यांपेक्षा रुचकर असते, त्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीवन्यजीवशेतीबाजार