नवीन डाळी बाजारात दाखल झाल्या आहेत. दुष्काळ परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी पावसामुळे डाळीचे पिके वाया गेले आहे. यामुळे डाळीचे प्रमाण व आवक कमी प्रमाणात होत आहे.
त्यामुळे किमतीवर त्याचा जास्त नाही; पण थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे. नवीन डाळी बाजारात दाखल झाल्या असल्या तरी भाव मात्र शंभरीपार झाला आहे. लातूर, बीड, नांदेड या भागातून डाळीची आवक सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते.
बाजारपेठेमध्ये नवीन डाळी आल्या तरी पावसामुळे डाळीचे नुकसान झाले असून दरावर परिणाम होईल. नवीन आवक अल्प आहे. भाव कमी होण्याची शक्यता नाही.
कोणत्या डाळीचा भाव काय? (प्रतिकिलो)
प्रकार | सध्याचा भाव | आधीचा भाव |
तूरडाळ | १५० | ८० |
हरभरा | १०० | ७२ |
उडीद | १४० | ८० |
मसूर | १०२ | ६० |
मूगडाळ | ११० | ८० |
उडीद | १४० | १०० |
दुष्काळ, पावसामुळे अनेक डाळींची पिके वाया गेली आहेत. डाळी बाजारात आल्या तर दरात मात्र थोडाफार परिणाम होईल, शक्यतो करून दर स्थिर राहतील. - सदाशिव खराडे, व्यापारी किराणा हुशार विक्रेता कार्यकारी सदस्य
नवीन डाळी आल्यामुळे बाजारातील डाळीच्या किमती कमी होतील. यामुळे ग्राहकाचा फायदा होईल, शंभराच्या वर डाळीचे दर गेले आहेत, ते कमी होण्यास मदत होईल. - उत्तम दुधाळ, व्यापारी