Join us

नवी तूर आली बाजारात, मागील चार दिवसापासून किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:57 AM

ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत हा भाव क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी कमी

हिंगोलीच्या वयेथील बाजार समितीच्या मोंढ्यात मागील चार दिवसांपासून नवी तूर विक्रीसाठी येत आहे. सध्या ७ हजार ३९९ ते ८ हजार २५१ रुपये भाव मिळत आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत हा भाव क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी कमी असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह तुरीला बसला. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन भरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले. तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे तुरीचे नुकसान झाले. यातून पीक सावरते न सावरते तोच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला.

तूर काढणीला वेग

मागील पंधरवड्यापासून तूर काढणीचे काम सुरू असून, उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांना तूरडाळीसाठी लागतील तेवढ्या तुरीचे उत्पादनही झाले नाही. त्यामुळे सोयाबीन पाठोपाठ तुरीनेही यंदा शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे.

सध्या सरासरी १०० क्विंटल तूर विक्रीसाठी मोंढ्यात आहे. किमान ७ हजार ३९९ ते कमाल ८ हजार २५१ रुपये क्विंटलने तूर विक्री होत आहे. तर सरासरी ७ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. एकीकडे उत्पादनात घट झाली असताना दुसरीकडे भावही कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

आज सोयाबीन तुरीला किती मिळाला दर?

सोयाबीन उत्पादकांची दरकोंडी कायम...

■ अत्यल्प पाऊस, यलो मोमॅकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्याहून खाली आले. त्यामुळे यंदा किमान ६ हजार रुपये भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत सोयाबीनने पाच हजारांचाही पल्ला गाठला नाही.

■ सध्या सरासरी ४ हजार ५०१ रुपये प्रतिविचेटलने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नवे सोयाबीन उपलब्ध होऊन सुमारे दीड महिन्यांवर कालावधी उलटला आहे.

■ अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना घरातच ठेवले आहे. परंतु, भाव काही वाढत नसल्याचे चित्र आहे. येणाऱ्या दिवसांतही भाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीची चाहूल; गहू, तांदूळ, डाळींचे भाव घसरले

गहू, ज्वारीची आवक मंदावली

मागील पंधरवड्यापासून मोंढ्यात गहू, ज्वारीची आवक मंदावली आहे. सध्या गहू सरासरी ४० ते ५० क्चिटल विक्रीसाठी येत आहे तर सरासरी २ हजार ९२५ रुपये भाव मिळत आहे. ज्वारीची आवक १५ क्चिटल होत असून, सरासरी २ हजार ९८५ रुपये भाव मिळत आहे.

टॅग्स :तूरतुराबाजारमार्केट यार्ड