Join us

एक किलो जांभळाला मिळतोय इतका दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:42 PM

जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात; परंतु सध्या एक किलो जांभळाचा दर ३०० रुपयांपुढे गेला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सांगली शहरातील बाजारात जांभळाचे दर किलोला तीनशे पार झाले आहेत. यंदा बाजारात जांभळे उशिराच दाखल झाली आहेत. जांभूळ आरोग्यदायी आणि हंगामी फळ असल्याने त्याची चव घेण्यासाठी खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात; परंतु सध्या एक किलो जांभळाचा दर ३०० रुपयांपुढे गेला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मधुमेहात जांभूळ गुणकारी असल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे. रानमेवा म्हणून भेटणाऱ्या जांभळाला फळांच्या पंगतीत वरचे स्थान प्राप्त झाले आहे. जांभळाच्या झाडांची तोड झाल्याने जांभूळ विकत घेऊन खावे लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली.

उपलब्धतेनुसार दरवाढ असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जांभळात ब्लू-बेरीच्या तुलनेत जास्त फायबर असते. ज्यामुळे मधुमेहींसाठी जांभळाचे सेवन हा उत्तम पर्याय ठरतो.

सांगलीच्या बाजारामध्ये आज जांभळाचा भाव तीनशे रुपये किलो इतका झाला अशी माहिती व्यापारी राजू शिंदे यांनी दिली आहे. तरीही ग्राहकांची औषधी असल्याने जांभळास मागणी आहे.

वास्तविक पावसानंतर जांभूळ खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र यंदा पावसाळ्यातही जांभळाला मागणी आहे. शिराळ्यातील डोंगर रांगांबरोबरच शहराता सुद्धा काही ठिकाणी जांभळाची झाडे सहजरीत्या आढळून येते.

जांभळाचा गर आणि बी हे दोन्हीही वेगवेगळ्या आजारांसाठी उपयुक्त आहे. मधुमेह रुग्ण गर खाऊ शकतात. त्यामुळे साखर वाढत नाही. जांभूळ खाण्याचे प्रमाण वयस्कर लोकांमध्ये, महिलांमध्ये जास्त आहे. खाण्यापूर्वी जांभळाला स्वच्छ धुऊन खावे. लहान मुलांनाही ते खाऊ घालणे चांगले आहे. - डॉ. विजया सुहास पाटील

टॅग्स :बाजारमार्केट यार्डफळेसांगलीपाऊस