कांद्याची लासलगाव बाजारातील दिनांक २० मे आधीच्या आठवड्यात सरासरी किंमत रु. १५६८ प्रती क्विंटल अशा होत्या. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत किंमतींत २ टक्केनी वाढ झाली आहे.
दरम्यान देशपातळीवर तसेच राज्यात कांद्याची आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत २२ टक्केनी घट झाली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीला प्राधान्य दिल्याने कांदा आवक घटली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान आज दिनांक २३ मे रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीची विंचूर उपबाजार समितीत कांद्याची आवक ७२०० क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी सरासरी १६७५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
मनमाड बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
आजचे बाजारभाव असे
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
खेड-चाकण | --- | 175 | 1300 | 1900 | 1500 |
भुसावळ | लाल | 34 | 1200 | 1700 | 1500 |
पुणे -पिंपरी | लोकल | 12 | 800 | 1800 | 1300 |
पुणे-मोशी | लोकल | 678 | 500 | 1400 | 950 |
येवला | उन्हाळी | 3500 | 500 | 1948 | 1550 |
लासलगाव - विंचूर | उन्हाळी | 7200 | 700 | 2000 | 1675 |
मनमाड | उन्हाळी | 800 | 500 | 1767 | 1400 |