Lokmat Agro >बाजारहाट > कांदा प्रतिक्विंटल नऊशे रुपयांवर, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

कांदा प्रतिक्विंटल नऊशे रुपयांवर, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

Onion at nine hundred rupees per quintal, read today's onion market price | कांदा प्रतिक्विंटल नऊशे रुपयांवर, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

कांदा प्रतिक्विंटल नऊशे रुपयांवर, वाचा आजचे कांदा बाजारभाव 

गेल्या काही दिवसात सातत्याने बाजारभाव घसरत असून आज देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून आले.

गेल्या काही दिवसात सातत्याने बाजारभाव घसरत असून आज देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा दरातील घसरण सुरूच असून कालच्या सुट्टीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली. तर बाजारभाव देखील घसरला असून आता नऊशे रुपये प्रति क्विंटल वर येऊन पोहचला आहे.  आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 1100 रुपये तर  येवला बाजार समितीमध्ये केवळ 900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. त्यामुळे पुढील काही दिवसांत बाजारभावात सुधारणा होते की काय हे पाहावे लागणार आहे. 

कालच्या 26 जानेवारीच्या सुट्टीनंतर आज बाजार समित्या सुरु असून शेतमालाचे लिलाव सुरु असल्याचे पाहायला मिळाले. बाजार समित्यामध्ये कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार आज कांद्याला सरासरी नऊशे रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या काही दिवसात सातत्याने बाजारभाव घसरत असून आज देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून आले. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांदा बाजारभावात सातत्याने घसरण होत असून शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत. एकीकडे सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याची लागवड सुरु असताना लाल कांद्यातून भांडवल जमा करण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी बाजार समितीत पाउल टाकत असताना मात्र कांदा बाजारभावात घसरण शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. 

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार चांदवड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 10 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 408 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी केवळ 1050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर पिंपळगाव बसवंत बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 400 रुपये मिळाला तर सरासरी 1050 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. तर मंगळवेढा बाजार समितीत केवळ दीडशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/01/2024
कोल्हापूर---क्विंटल55843001500900
अकोला---क्विंटल2530120016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल26354001500950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल487120020001500
सोलापूरलालक्विंटल408281001775900
येवलालालक्विंटल180002001151900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल57960020001300
धुळेलालक्विंटल48111001000800
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1420040013001100
पंढरपूरलालक्विंटल18620013101000
नागपूरलालक्विंटल1000100016001500
सिन्नर - नायगावलालक्विंटल9052001101975
राहूरी -वांबोरीलालक्विंटल64181001100700
चांदवडलालक्विंटल1000040813501050
मनमाडलालक्विंटल45002001220800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल83404001176930
पेनलालक्विंटल360300032003000
भुसावळलालक्विंटल3670012001000
यावललालक्विंटल1200480790600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल761130017001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4800800800
पुणे-मोशीलोकलक्विंटल8363001000650
वडगाव पेठलोकलक्विंटल65100020001200
मंगळवेढालोकलक्विंटल4071501300900
नागपूरपांढराक्विंटल680120016001500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1000040015101050

 

Web Title: Onion at nine hundred rupees per quintal, read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.