गेल्या १२ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या लिलाव बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुमारे १००० ते १२०० कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे. मुख्य मागणी असलेल्या ४० टक्के निर्यात शुल्क रद्दबाबत केंद्र सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने बंदच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता असल्याने शेतकरीवर्ग भांबावलेल्या स्थितीत आहे.
आजदरम्यान, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात कांदा लिलाव दि. २ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून येत्या मंगळवारी (दि.३) अन्य बाजार समित्याही सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज अशी झाली कांदा आवकलासलगाव बाजारसमितीची उपबाजार समिती असलेल्या निफाड बाजारसमितीत आज दिनांक २ ऑक्टोबरपासून कांदा लिलावांना सुरुवात झाली आहे. याठिकाणी सकाळच्या सत्रात ३०० नगांची आवक झाली. या ठिकाणी कांदा बाजार भाव कमीत कमी कांदा बाजारभाव ९०० रुपये, जास्तीत जास्त २३१९ व सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल होते.
आज विंचूर बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सुमारे १२०० नग आवक झाल्याने इथे प्रचंड गर्दी झाली होती. लिलाव सुरू झाल्यापासून येथे शेतकरी दूरवरून आपल्या गाड्या घेऊन कांदा विक्रीसाठी येत आहेत. भावही टिकून असल्याने शेतकरी विंचूर बाजारसमितीला पसंती देत आहेत. सकाळच्या सत्रात कांदा बाजार भाव कमीत कमी १००० रुपये, जास्तीत जास्त २५११ व सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल असे होते.
आज सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीतील कांदा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण |
---|---|---|---|---|---|---|
पुणे | लोकल | क्विंटल | 11982 | 800 | 2400 | 1600 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 6 | 1500 | 2400 | 1950 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 734 | 700 | 2200 | 1450 |
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदमुळे पणनमंत्र्यांनी बंदमध्ये सहभागी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द वा निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्याही; परंतु व्यापाऱ्यांनीच कांदा खरेदीत काहीही रस नसल्याचे दाखवत आपले परवाने बाजार समितीत स्वतःहून जमा करत शासनाला दणका दिला. त्यातच बाजार समित्यांतील पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक व्यापाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधांमुळे कारवाईतही अनेकांनी हात आखडता घेतला आहे. दरम्यान, बंदमुळे शेतकऱ्यांना आपला कांदा चाळीतून बाहेर काढणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे बाजार समित्या कधी सुरू होतील याची प्रतीक्षा आहे.
आणि विंचूरला केला रास्ता रोकोबंदमध्ये सहभागी न होता कांदा लिलाव सुरू ठेवणाऱ्या विंचूरच्या कांदा व्यापाऱ्यांना सोशल मीडियावर शिवीगाळ करणारा मुंगसे येथील व्यापाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे आज २ ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्यांनी काही काळ रास्ता रोको करून संबंधितांवर कारवाई करण्याचे पोलिस स्थानकात निवेदन दिले. मात्र या रास्ता रोकोमुळे लिलावावर काहीही परिणाम झाला नाही. कांदा लिलाव सुरळीत झाले आहेत.
मुख्यमंत्री महोदयांना विनंती की, दरवेळी वेगवेगळे प्रश्न निर्माण करून शेतकरी बांधव, गावातील छोटे-मोठे व्यावसाईक, मार्केट कमिटी व शासनास वेठीस धरणार्या अशा मुजोर व्यापार्यांचा शासकीय यंत्रणेकडुन शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच अशा व्यापार्यांचे मार्केट कमिटीने परवाने रद्द करून त्यांना दिलेले प्लॉट, जागा, शेड व इतर सोई सुविधा त्यांचेकडुन काढुन घेणेबाबत मार्केट कमिटी प्रशासनाला आदेश व्हावेत. प्रकाश सर्जेराव पाटील, तालुका प्रमुख, शिवसेना
नाफेडच्या खरेदीवर प्रश्नचिन्हकेंद्र सरकारने लिलाव बंदमुळे शेतकन्यांकडून दोन लाख टन कांदा नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी करण्याला मजुरी दिली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात आणखीच संतापाची भावना निर्माण झाली आहे. नाफेडकडून केवळ उच्चप्रतीचाच कांदा खरेदी केला जाणार असल्याने त्याचा थोड्याच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेकांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर- जिल्ह्यातील बाजार समितीवर हजारो मजूर अवलंबून असून लिलाव बंद असल्यामुळे या मजुराच्या उदरनिर्वाहावर गंडांतर आले आहे. बाजार समित्यात हमाली काम करणाऱ्या वर्गाची हाल काम करणाच्या संख्या मोठी आहे.- हातावर पोट असलेल्या या मजुरांबरोबरच ट्रान्सपोर्ट व्यवसा यातील चालक-क्लीनर यांच्याही हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे या वर्गालाही बाजार समित्यांचे कामकाज सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
व्यापाऱ्यांच्या बैठकांवर बैठका कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकांवर बैठका सुरू असून त्याचे मन वळविण्याचे प्रयत्न बाजार व्यापाऱ्यांच्या समित्याकडूनही केले जात आहे. सायखेडा येथे रविवारी (दि.१) व्यापायाची बैठक झाली; परंतु बैठकांवर त्यात निर्णय होऊ शकला नाही, तर विचूरनंतर निफाडला मार्केट सुरू होण्याचे सूतोवाच केले गेल आहे. काही बाजार समित्याना २ ऑक्टोबरला गांधी जयतीतिर्मित सुट्टी असल्याने ३ ऑक्टोबरपासून लिलाव पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
लासलगाव बाजार समिती अंतर्गत विचूरचे मार्केट सुरु आहे, तर निफाडचेही मार्केट सुरु करण्यास व्यापारीवर्गानि अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा माल विक्री होण्यास अडचणी येणार नाहीत. लासलगावचायत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, लासलगाव कृउबा
व्यापाऱ्यांनी अद्यापही बंद मागे घेण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. येत्या मंगळवारी लिलाव पूर्ववत होतील, अशी अपेक्षा आहे; परंतु.. व्यापायांनी बंद सुरूच ठेवल्यास त्याच्यावर कारवाईची पावले उचलली जातील. - संजय लोंढे, सचिव, पिंपळगाव बाजार समिती.