Join us

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील लिलाव सुरू; आजचे कांदा बाजारभाव असे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 1:01 PM

नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव सुरू झाले आहेत. लासलगाव, पिंपळगावसह जिल्हयातील जवळपास सर्वच बाजारसमित्यांमध्ये कांदा आणि भुसार -धान्य लिलाव सुरू होते. आजचे कांदा बाजारभाव जाणून घेऊन या.

आज लासलगाव आणि पिंपळगाव बाजारसमितीमध्ये १३ दिवसांच्या खंडांनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, कळवण,अभोणा, कनाशी, देवळा, सटाणा, नामपूर, उमराणे, सिन्नर, येवला, सायखेडा या ठिकाणचे कांद्यासह धान्य लिलावही सुरू झाले असल्याचे समजते.

व्यापाऱ्यांनी काल संप मागे घेतल्याने आज दिनांक ३ ऑक्टोबर पासून लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. तत्पूर्वी विंचूर आणि निफाड उपबाजारातकांदा लिलाव सुरू होते, तसेच धान्याचे लिलावही सुरू होते.

अनंत चतुर्दशीपासून लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत कांदा व्यवहार सुरू करण्याचा निर्णय स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला होता. त्यानंतर या ठिकाणी दररोज विक्रमी कांदा आवक होत होती. त्यामुळे बाजारालगत असलेल्या नाशिक-संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विंचूरचे कांदा बाजारभाव आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत ९३९ नगांची आवक झाली. कमी कांदा बाजारभाव ८०० रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २५०० तर सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल आहेत, अशी माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली.

लासलगावचे कांदा बाजारभावलासलगाव येथे सकाळच्या पहिल्या सत्रात ५४५ नग उन्हाळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी दर ८००रु, जास्तीत जास्त २५४१, तर सरासरी २०५१ रुपये प्रति क्विंटल असे कांदा बाजार भाव सकाळच्या सत्रात होते.

लासलगाव येथील लिलावांसाठी शेतकऱ्यांनी अशी गर्दी केली होती.

पिंपळगावचे कांदा बाजारभाव पिंपळगाव बाजारसमितीत आज सकाळी ४५०० क्विंटल कांदा लिलावाचे व्यवहार झाले. उन्हाळी कांद्याला किमान ९०० जास्तीत जास्त २५०१ आणि सरासरी २२०० रुपयांचा बाजार भाव मिळाला.

दरम्यान  नाशिक व्यतिरिक्त राज्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये कांदा दर काय होते, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---2679100027001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---13586100024001700
कराडहळवा150150023002300
सोलापूरलाल1599010035001700
जळगावलाल47975022001500
नागपूरलाल1240200030002750
पेनलाल360300032003000
पुणेलोकल1404790025001700
पुणे- खडकीलोकल8120023001750
पुणे -पिंपरीलोकल7170026001950
पुणे-मोशीलोकल57170020001350
कामठीलोकल11200030002500
कल्याणनं. १3220024002300
सोलापूरपांढरा27820044002400
नागपूरपांढरा1000300040003750
लासलगाव - विंचूरउन्हाळी500080025002050
सिन्नर - नायगावउन्हाळी39650023502000
मनमाडउन्हाळी150050023502000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी450090025012200
भुसावळउन्हाळी23130020001800
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार