Lokmat Agro >बाजारहाट > कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

Onion export ban lifted; Let's know the market price of onion today | कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

कांदा निर्यातबंदी हटली; आज कांद्याला काय बाजारभाव मिळाला, जाणून घेऊ

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव काय आहेत ते.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव काय आहेत ते.

शेअर :

Join us
Join usNext

आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने नाशिक परिसरातील लासलगाव, पिंपळगावसह अनेक बाजारसमित्यांना सुटी असते. त्यामुळे येथील लिलाव होत नाहीत. मात्र पुण्यासह अनेक ठिकाणी रविवारीही लिलाव होतात.

आज पुणे बाजारसमितीत १६ हजार ७२५ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव ५०० रुपये तर सरासरी कांदा बाजारभाव १ हजार ५० रुपये असे मिळाले.

सातारा बाजारसमितीत केवळ ३३४ क्विंटल आवक झाली. त्यानंतर कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर सरासरी १३०० रुपये मिळाला.

हेही वाचा :केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली

दरम्यान केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली असली, तरी त्याचे  नोटीफिकेशन अजून हातात पडायचे आहे, तसेच त्यातील अटी व शर्ती काय आहेत, हे पाहूनच कांदा व्यापाराची पुढील दिशा ठरणार असल्याचे लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या सुटीनंतर कांदा बाजार सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना बाजारभावात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र बाजार किती रुपयांनी वाढणार हे सांगण्यास व्यापारी प्रतिनिधींनी हतबलता दर्शविली असून प्रत्यक्ष लिलावाच्या वेळेस शेतकऱ्यांना याचा अंदाज येईल.  

कांदा बाजारभाव असे

बाजार समिती

जात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

18/02/2024
सातारा---334100016001300
राहता---38420016001100
पुणेलोकल1672550016001050
पुणे- खडकीलोकल5100014001200
पुणे-मोशीलोकल4737001000850
मंगळवेढालोकल3750013001000

Web Title: Onion export ban lifted; Let's know the market price of onion today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.