आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने नाशिक परिसरातील लासलगाव, पिंपळगावसह अनेक बाजारसमित्यांना सुटी असते. त्यामुळे येथील लिलाव होत नाहीत. मात्र पुण्यासह अनेक ठिकाणी रविवारीही लिलाव होतात.
आज पुणे बाजारसमितीत १६ हजार ७२५ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव ५०० रुपये तर सरासरी कांदा बाजारभाव १ हजार ५० रुपये असे मिळाले.
सातारा बाजारसमितीत केवळ ३३४ क्विंटल आवक झाली. त्यानंतर कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर सरासरी १३०० रुपये मिळाला.
हेही वाचा :केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली
दरम्यान केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली असली, तरी त्याचे नोटीफिकेशन अजून हातात पडायचे आहे, तसेच त्यातील अटी व शर्ती काय आहेत, हे पाहूनच कांदा व्यापाराची पुढील दिशा ठरणार असल्याचे लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या सुटीनंतर कांदा बाजार सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना बाजारभावात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र बाजार किती रुपयांनी वाढणार हे सांगण्यास व्यापारी प्रतिनिधींनी हतबलता दर्शविली असून प्रत्यक्ष लिलावाच्या वेळेस शेतकऱ्यांना याचा अंदाज येईल.
कांदा बाजारभाव असे
बाजार समिती | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
18/02/2024 | |||||
सातारा | --- | 334 | 1000 | 1600 | 1300 |
राहता | --- | 384 | 200 | 1600 | 1100 |
पुणे | लोकल | 16725 | 500 | 1600 | 1050 |
पुणे- खडकी | लोकल | 5 | 1000 | 1400 | 1200 |
पुणे-मोशी | लोकल | 473 | 700 | 1000 | 850 |
मंगळवेढा | लोकल | 37 | 500 | 1300 | 1000 |