Lokmat Agro >बाजारहाट > कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच!

कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच!

Onion farmers are desperate, onion prices continue to fall! | कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच!

कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच!

कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे.

कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून एकीकडे कांदा दरात झालेली घसरण दुसरीकडे उन्हाळ कांद्याची लागवड सुरु आहे. मात्र कांदा रोपे देखील महाग झाल्याचे चित्र आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे. नाशिकच्या  पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज उन्हाळा कांद्याला सरासरी 1600 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. 

केंद्राच्या कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे शेतकरी दिवसरात्र काबाड कष्ट करून शेतात कांदा पिकवत असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला 1725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर काल याच बाजारसमितीत 1800 रुपये दर मिळत होता. म्हणजेच आज पुन्हा 75 रुपयांनी कांदा घसरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हळूहळू भाव वाढण्याऐवजी भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

कांदा दरात घसरण सुरूच 
- दरम्यान आज सकाळी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत झालेल्या कांदा लिलावांत लाल कांद्याला कमीत कमी 751 रुपये रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर सरासरी केवळ 1725 रुपये दर मिळाला.

- पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी 800 हजार रुपये दर मिळाला. उन्हाळी कांद्याची आवक आता बाजारसमित्यांमधून जवळपास घटत चालली असून दिवसाकाठी अवघे दीडशे ते दोनशे क्विटल उन्हाळी कांदा बाजारसमित्यांत दाखल होत आहे. पिंपळगावला उन्हाळ कांद्याला सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 

आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान सिन्नर - नायगाव बाजारसमितीत 311 क्विंटल लाल कांदा दाखल झाला. त्याला कमीत कमी म्हणजे 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर सरासरी 1800 रुपये प्रति किटल दर मिळाला.

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव जाणून घ्या.. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/12/2023
कोल्हापूर---क्विंटल800850025001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल263150018001150
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल640225030002500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1180075119001725
धाराशिवलालक्विंटल14140020001700
पंढरपूरलालक्विंटल18720030001800
सिन्नर - नायगावलालक्विंटल31150019001800
मनमाडलालक्विंटल200050018481600
पेनलालक्विंटल261300032003000
भुसावळलालक्विंटल24100015001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल4823001600950
शेवगावनं. १नग750160020002000
शेवगावनं. २नग700100014001000
शेवगावनं. ३नग328300900900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल850080022011751
कळवणउन्हाळीक्विंटल375120017001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल38070019511600

Web Title: Onion farmers are desperate, onion prices continue to fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.