Join us

आज ‘या’ ठिकाणी कांद्याला सर्वात कमी बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:57 PM

आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे, मनमाड, देवळा यांसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत कांद्याला काय बाजारभाव मिळाले, जाणून घेऊ या.

आज दिनांक ८ फेब्रुवारी २४ रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत ८१९४ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली, तर लासलगाव उपबाजार असलेल्या विंचूर बाजारसमितीत १० हजार ५०० क्विंटल आवक झाली. पिंपळगाव बसवंत येथील बाजारसमितीत पोळ कांद्याची सकाळच्या सत्रात १२ हजार क्विंटल आवक झाली. 

आज लासलगाव बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये तर सरासरी बाजारभाव ११०० रुपये प्रति क्विंटल इतके मिळाले. पिंपळगाव बसवंत येथील बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी ३०० तर सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. 

आज धुळे आणि मनमाड बाजारसमितीत सर्वात कमी म्हणजेच २०० रुपये प्रति क्विंटल कमीत कमी  बाजारभाव मिळाला. नागपूर बाजारसमितीत पांढऱ्या कांद्याला कमीत कमी बाजारभाव १ हजार रुपये इतका मिळाला.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांद्याचे बाजारभाव खालीलप्रमाणे होते.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---8960110017001400
सातारा---321100016001300
येवलालाल1300045013011050
धुळेलाल85720013401000
लासलगावलाल819460013011100

लासलगाव

- विंचूर

लाल1050040012811100
नागपूरलाल152080016001400
मनमाडलाल400020013001000
दिंडोरी-वणीलाल460890116861275
देवळालाल268030011751100

सांगली

-फळे भाजीपाला

लोकल3264030017501075
पुणेलोकल1308550016001050
पुणे-मोशीलोकल9733001200750
कल्याणनं. १3130015001400
नागपूरपांढरा1000100016001450
पिंपळगाव बसवंतपोळ1200030015001100
टॅग्स :कांदाबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी