आज आर्थिक वर्षाचा म्हणजेच मार्च महिन्याचा शेवटचा असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये पन्नास हजार क्विंटलची आवक झाली आहे. तर आज कांद्याला सरासरी 1100 रुपयापासून ते 1600 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लाल कांद्याची आवक आज कुठेच झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याची आवकच घटली आहे.
आज 31 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार आज राज्यातील दौंड-केडगाव, सातारा, जुन्नर -आळेफाटा, पुणे, पुणे- खडकी, पुणे- खडकी, पुणे-मोशी, वाई, पारनेर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. आज पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक 19 हजार 440 आवक झाली. मात्र इथे केवळ सरासरी 1 हजार रुपये भाव मिळाला. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत दाखल झालेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1450 रुपये इतका भाव मिळाला.
तसेच पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 16 हजार 371 इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी केवळ 400 रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. दौंड-केडगाव बाजार समितीत सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला. तसेच पुणे -पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1600 रुपये मिळाला.
असे आहेत आजचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
31/03/2024 | ||||||
दौंड-केडगाव | --- | क्विंटल | 5968 | 700 | 2000 | 1600 |
सातारा | --- | क्विंटल | 261 | 700 | 1500 | 1100 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 8785 | 1000 | 1910 | 1450 |
पुणे | लोकल | क्विंटल | 19440 | 400 | 1600 | 1000 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 21 | 800 | 1500 | 1150 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 7 | 1600 | 1600 | 1600 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 327 | 600 | 1500 | 1050 |
वाई | लोकल | क्विंटल | 12 | 700 | 1500 | 1100 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 16371 | 400 | 1800 | 1300 |